(Reservation in promotion) पदोन्नतीतील आरक्षणासाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला
पुणे : पदोन्नतीतील आरक्षण (Reservation in promotion) देण्यात यावे या व संविधानिक हक्क व आरक्षण संपविण्याच्या षड्यंत्राविरुद्ध आवाज उठवण्यासाठी आरक्षण हक्क कृती समितीच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला. An agitation was organized on behalf of the Reservation Right Action Committee to raise voice against the conspiracy to end reservation and promotion of reservation in promotions.
महाराष्ट्र ऑफिसर्स फोरमचे राज्य सहसचिव तथा आरक्षण राज्य आरक्षण हक्क कृती समितीचे सदस्य डॉ.बबन जोगदंड व मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेचे संजय घोडके, बानाईचे अध्यक्ष पांडुरंग शेलार यांच्या नेतृत्वाखाली पुणे स्टेशन समोरील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे भव्य आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात पुणे शहरातील विविध संघटनाचे प्रतिनिधी,राजकीय संघटनांचे प्रतिनिधी मोठया संख्येने सहभागी झाले होते. मोर्चेकऱ्यानी निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री कटारे यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. (Reservation in promotion)
राज्य शासनाने 7 मे 2021 रोजी पदोन्नतीच्या आरक्षणाच्या विरोधी शासन निर्णय काढून मागासवर्गीयांच्या पदोन्नतीवर गदा आणली आहे .हा शासन निर्णय रद्द करण्यात यावा,मागासवर्गीयचा नोकऱ्यातील अनुशेष भरण्यात यावा या व इतर विविध मागण्यासाठी हा मोर्चा होता.
या मोर्चाची भूमिका आरक्षण हक्क कृती समितीचे राज्य प्रतिनिधी संजय घोडके यांनी मांडली. त्यानंतर डॉ. संजय दाभाडे, रिपाईचे नेते परशुराम वाडेकर, राहुल डंबाळे यांनी भविष्यामध्ये पदोन्नतीतील आरक्षणाचा प्रश्न शासनाने जर लवकर सोडविला नाही तर आरक्षणाच्या मागणीसाठी व्यापक लढा उभारावा लागेल,असे सांगितले.
मोर्चेकऱ्यांनी यावेळी अनेक घोषणा दिल्या. त्यामध्ये पदोन्नतीतील आरक्षण कायम ठेवून तात्काळ मागासवर्गीय अधिकारी- कर्मचाऱ्यांना बढती देण्यात यावी, त्याचबरोबर मागासवर्गीयांवरील अन्याय-अत्याचार रोखण्यात यावेत. आरक्षणासाठी जी समिती स्थापन केली त्याचे अध्यक्ष बदलण्यात यावेत या व इतर मागण्यांचा या मध्ये समावेश होता.