(obc reservation) मंत्र्यांना आंदोलन शोभते का ? : पंकजा मुंडे

पुणे : ओबीसींच्या  (obc reservation) राजकीय आरक्षणासाठी भाजपाने राज्यव्यापी आंदोलनाचीघोषणा केली. त्यानंतर महाविकास आघाडी सरकारमधील एका  पक्षाने आंदोलनाची घोषणा केली. या मंत्र्यांना आंदोलनाची शोभते का? आम्ही मंत्री असताना आंदोलन न करता आरक्षणाला संरक्षण दिले, मंत्र्यांनी आंदोलन नाही तर निर्णय करायचे असता. आंदोलनासाठी विरोधी पक्ष आहे, अशा शब्दात भारजीय जनता पक्षाच्या सचिव तथा माजी मंत्री पंकजा मुंडे  (pankaja munde) यांनी काँग्रेसवर टिकास्त्र सोडले. BJP announces statewide agitation for political reservation of OBCs. Subsequently, a party in the Mahavisak alliance government declared agitation.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी कात्रज चौकात पुणे शहर भाजपच्या वतीने आंदोलन करण्यात आले. त्यावेळी पंकजा मुंडे बोलत होत्या. Agitations on behalf of Pune City BJP at Katraj Chowk for political reservation of OBCs


आम्ही सत्तेत असताना ओबीसीचे आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वर गेले याच्याविषयी न्यायालयात तारखा सुरु होत्या, ते आरक्षण कसे योग्य आहे, हे सांगण्यासाठी आम्ही न्यायालयात डाटा दाखल करत होतो. तेवढ्यात आचारसंहिता लागली. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले आणि जवळपास पंधरा महिने झाले, हे सरकार फक्त न्यायालयाकडून तारखाच घेत आहे.इंपिरिकलच्या आधारे कृष्णमूर्ती यांच्या मतांच्या आधारावर सरकारने हा सगळा डाटा सबमिट करावा, असे त्यांनी सांगितले. पण या सरकारने कुठलाही डाटा तयार केला नाही. सरकार फक्त गोल गोल फिरवत आहे, असा आरोप मुंडे यांनी केला.   (obc reservation)

माठाची तिपई बघते, तेव्हा मला सरकार दिसते
अटल बिहारी वाजपेयी म्हणायचे, छोटे मन से कोई बडा नही होता, टूटे मन से कोई खडा नही होता. या सरकारला मला सांगायचे की एवढं छोटं मन ठेऊन तुम्ही मोठे होऊ शकत नाहीत. चुकून तुम्ही राजकारणात आलात. भविष्यात जनता तुम्हाला दारात देखील उभे करणार नाही, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. जेव्हा मी माठाची तिपई बघते, तेव्हा मला आत्ताचे सरकार दिसते. सगळे आंदोलन गार करण्यासाठी हे तिपईचे सरकार आहे. त्यावरच्या मटक्यावर सगळे आंदोलने गार करणे हे सरकारचे कर्तव्य दिसत आहे, अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी महाविकास आघाडी सरकारवर टिका केली. (obc reservation) (No one is bigger than a small mind, no one stands with a broken mind.)

Local ad 1