(GST) जीएसटीमध्ये हेराफेरी करणाऱ्या व्यापाऱ्याला ठोकल्या बेड्या 

पुणे  :  महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने कर चुकवेगिरी करणाऱ्या करदात्यांविरोधात कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली.  या दरम्यान, १३० कोटींपेक्षा जास्त रकमेच्या बोगस पावत्या दिल्याप्रकरणी ओमप्रकाश तिरथदास सचदेव या व्यापाऱ्यास राज्य जीएसटी पुणे विभागाकडून अटक करण्यात आली, अशी माहिती सहायक राज्य कर आयुक्त बी.व्ही. जुंबड यांनी दिली. Merchant evades GST by showing false bills of Rs 130 crore

ओमप्रकाश सचदेव याचे मे. श्री वाहेगुरु ग्लोबल माईन्स प्रायव्हेट लिमिटेड, ही कंपनी  त्याच्या स्वतःच्या नावे तसेच  मे. ट्रेडर्स भावरे, में. प्रकाश ट्रेडर्स, में. अगरवाल इंटरप्रायजेस, में. कोल्हे सेल्स, में. किरण ट्रेडिंग कंपनी, में. नारायण ट्रेडर्स, में. काशमोरा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड, में. मरीकम्बा ट्रेडिंग प्रायव्हेट लिमिटेड  में सिओसिस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्या इतर व्यक्तीच्या नावे स्थापन करून वस्तू व सेवाकर अधिनियम २०१७ अंतर्गत नोंदणी दाखले घेतले. Merchant evades GST by showing false bills of Rs 130 crore

       

  या कंपन्याच्या माध्यमातून ओमप्रकाश सचदेव याने १३०.०५ कोटी रकमेची खोटी देयके देऊन १९.७९ कोटींचा इनपुट टॅक्स क्रेडिट पुढील खरेदीदारांना दिला. त्याचप्रमाणे हा कर भरायला लागू नये यासाठी अनेक बोगस कंपन्यांकडून कोणत्याही वस्तू व सेवेच्या प्रत्यक्ष पुरवठयाशिवाय दाखवलेल्या बोगस खरेदी देयकांतून सुमारे  २२. ४८ कोटी रकमेचा इनपुट टॅक्स क्रेडिट प्राप्त करून घेतला. हे कृत्य हे महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियमाच्या कलम १३२ (ब) व (क) प्रमाणे गुन्हा असून १३२ (५) प्रमाणे  दखलपात्र व अजामीन पात्र आहे. तसेच कलम १३२(१) (i) प्रमाणे सदरहू गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंतच्या कारावासाची तरतूद आहे. Merchant evades GST by showing false bills of Rs 130 crore


        आरोपी सचदेवला मुख्य न्यायदंडाधिकारी,यांच्या न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याच कारवाई दरम्यान अशा प्रकारच्या बोगस कंपन्यांची माहिती पुणे राज्य वस्तू व सेवाकर विभाग यांना मिळालेली असून, त्यांच्याविरुद्ध नजीकच्या कालावधीत कारवाई करण्यात येणार आहे. 

Local ad 1