(Unemployed) नोकरीच्या अमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणुक

नांदेड ः   बेरोजगार युवकांना नोकरीचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांना चुना लावणाऱ्या लुटणाऱ्या टोळीला नांदेड, मुंबई, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील लखनऊ येथून अटक करण्यात आली. हिंगोली स्थानिक गुन्हे शाखा आणि वसमत शहर पोलिसांनी संयुक्त केलेल्या कारवाईत सहा जणांना बेड्या ठोकल्या असून, त्यांच्याकडून विस लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे, अशी माहिती. नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी (IPS officer Nisar Tamboli) यांनी पत्रकार परिषदेत दिली. (Fraud of unemployed youth for job greed)

वसमत येथील बेरोजगार युवकाला रेल्वेमध्ये शासकीय नोकरी लावतो, असे सांगुन उत्तर प्रदेशातील भामट्याने सुमारे दहा लाख रुपये घेतले. परंतु आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. युवकाच्याा तक्रारीवरुन पैसे घेणाऱ्याव र फसवणुकीचा गुन्हा वसमत शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला होता.अनेक बेरोजगार मुलांची फसवणूक करुन आरोपीतांनी करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे चौकशीत समोर आले.

पोलिस पथकाने सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी 9 जून रोजी नांदेड रेल्वे स्टेशन परिसरात सापळा रचून गुन्ह्यातील आरोपी रवींद्र उर्फ राबिंद्र दयानिधी संकुवा (वय 46) वर्षे रा. ओडिसा हल्ली मुक्काम काटेमान्नेवली, तालुका कल्याण, जिल्हा ठाणे, नरेंद्र विष्णुदेव प्रसाद (वय 55) राहणार लयरोपरुवार तालुका कोपागंज, जिल्हा महू, उत्तर प्रदेश यांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यात त्यांनी अनेक मुलांची फसवणूक केली असून, आपले इतर साथीदार नांदेड, मुंबई, दिल्ली व लखनऊ या ठिकाणी असल्याचे आहेत. संपूर्ण देशात शेकडो मुलांचे करोडो रुपये घेऊन बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याची धक्कादायक माहितीतपासात समोर आली.

आरोपिंनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस पथकाने सायबर सेलच्या मदतीने 11 जून आरोपी सतीश तुळशीराम हंकारे (वय 36) राहणार बोरगाव, तालुका लोहा, हल्ली मुक्काम अहमदपूर जिल्हा लातूर व नांदेड, आनंद पांडुरंग कांबळे (वय 24 ) राहणार अहमदपूर, जिल्हा लातूर यास ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यात त्यांनी अनेकांची फसवणूक केल्याचे समोर आले.


पोलिस पथक १३ जून रोजी मुंबईतून गौत्तम एकनाथ फणसे (वय ५६) रा. वाघणी ता. अंबरनाथ जिल्हा ठाणे यासा ताब्यात घेतले. त्यानेही मुंबई व परिसरातली अनेक बेरोजगारांना फसवल्याचे सांगितले. त्यानंतर पथकांने दिल्ली गाठून अभय मेघशाम रेडकर उर्फ राने (वय ४८) रा. मोतीनगर, न्यू दिल्ली मुळ पत्ता शिरोडा ता. वेंगुर्ले जिल्हा सिंधूदूर्ग यास सापळा लावून अटक केली. त्यानंतर गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोषकुमार सरोज बनवारीलाल सरोज (वय २९) रा. बोडेपूर ता. मच्छली जिल्हा जौनपूर याला लखनौ येथील एका लाजमधून ताब्यात घेतले.


आरोपिंकडून जप्त केलेले साहित्य

  गुन्ह्यातील मुख्य आरोपी संतोषकुमार सरोज बनवारीलाल  याच्या घरातून विविध मंत्रालयातील सचिव दर्जाच्या अधिकारी यांचे बनावट स्टॅम्प, रेल्वे अधिकारी यांच्या नावाचे बनावट नियुक्तीपत्र, भारत सरकार व उत्तर प्रदेश सरकार असे नाव असलेले लिफाफे तसेच बनावट नियुक्तीपत्र तयार करण्यासाठी लागणारा कागद, लॅपटॉप, रेल्वेचे बनावट ओळखपत्र, अनेक मुलांचे बनावट नियुक्तीपत्र, अनेक एटीएम कार्ड, मोबाईल सदर आरोपी त्यांच्या खात्यावर झालेले बँक व्यवहाराचे डिटेल्स असे साहित्य पोलिसांनी जप्त केले. (Fraud of unemployed youth for job greed)


आरोपिंनी वापरली 18 बँक खाती

गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत आरोपीतांनी वापरलेली १८ बँक खाती होल्ड करण्यात आले असून त्याचे खात्यावरील 11 लाख रुपये सिल करण्यात आले आहेत. तसेच आरोपींताकडून नगदी 56 हजार रुपये एक कार (आठ लाख रुपये), सात मोबाईल (50 हजार रुपये) असा एकूण वीस लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती निसार तांबोळी यांनी दिली आहे.

ही कारवाई पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, हिंगोली पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहायक पोलिस अधीक्षक यतीन देशमुख, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक उदय खंडेराय, वसमत शहरचे पोलिस निरीक्षक शिवाजी गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोदनापोड आणि फौजदार शिससांब घएवारे यांच्या पथकाने केली आहे. या पथकाचे तांबोळी यांनी कौतुक करुन पारितोषक जाहिर केले आहे. (Fraud of unemployed youth for job greed)

Local ad 1