(Goa for tourism) गोव्याला पर्यटनासाठी जाण्याचा विचार करताय, थोडं थांबा…
पणजी ः कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली, तरी अनेक राज्य सावध पावले उचलत आहेत. त्याप्रामाणे गोवा राज्यानेही पर्यटन सुरु करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्ही गोव्यात पर्यटनासाठी जाण्याचा विचार करत असाल तर थोड थांबा, कारण पुढील काही दिवस पर्यटन बंद असणार आहे. (If you are thinking of going to Goa for tourism, wait a minute)
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पुर्यटन सुरु करण्याबाबत भूमिका स्पष्ट केली. राज्यातील प्रत्येक १८ वर्षावरील व्यक्तीला करोनावरील लसीचा कमीत-कमी एक डोस मिळत नाही तोपर्यंत गोव्यातील पर्यटन पुन्हा सुरू होणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ३१ जुलैपर्यंत लसीकणाचे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
“किनारपट्टीवरील संपूर्ण लोकांचे पूर्णपणे लसीकरण केल्यावरच पर्यटन पुन्हा सुरू झाले पाहिजे. गोव्याचे पर्यटन उद्योग आम्ही कायमच बंद ठेवू शकत नाही कारण ते आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचे महत्त्वपूर्ण कणा आहे,” असे गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर सांगितले. (If you are thinking of going to Goa for tourism, wait a minute)
गोव्यात करोना संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या कर्फ्यूमध्ये २१ जूनपर्यंत वाढव करण्यात आली. अनेक दिवसांपासून गोव्यातील पर्यटन व्यवसाय बंद आहे. गोव्यात पर्यटनासाठी जगभरातील पर्यटक येत असतात. लॉकडाउनमुळे पर्यटन व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पर्यटन क्षेत्रातील व्यावसिकांकडून ही बंदी उठवण्याची मागणी केली जात आहे. त्यावर मुख्यमंत्री सावंत यांनी स्पष्टीकरण दिले. (If you are thinking of going to Goa for tourism, wait a minute)
“जोपर्यंत आम्ही राज्यभर लसीचा पहिला डोस देत नाही तोपर्यंत येथे पर्यटन सुरू होणार नाही. ३१ जुलैपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आमचे लक्ष्य आहे. ते उद्दीष्ट साध्य झाल्यावरच आम्ही पर्यटन पुन्हा सुरु करण्याचा विचार करू,” असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.