(Take care Nandedkar) नांदेडकरांनो काळजी घ्या ; कोरोना पुन्हा वाढण्याची भिती !

नांदेड : कोरोनाची तिसरी लाट ओसतरत असल्याने लाॅकडाऊन मधुन सुट देण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यातील रुग्णसंख्या 12 पर्यंत खाली आली होती. एका दिवस 15 रुग्ण आढळले होते. परंतु गुरुवारी (दि.17) 53 रुग्ण आढळले. त्यामुळे बाहेर पडताना काळजी घ्या, कोरोना अजून गेलेला नाही. Take care Nandedkar; Fear of Corona growing up again!

जिल्ह्यात गुरुवारी प्राप्त झालेल्या 2 हजार 684 अहवालापैकी 53 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 14 तर अँटिजेन तपासणीद्वारे 39 अहवाल बाधित आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 90 हजार 993 एवढी झाली असून यातील 88 हजार 173 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. 362 रुग्ण उपचार घेत असून 4 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

16 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे अर्धापूर तालुक्यातील दिग्रस येथील 85 वर्षाच्या एका पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत्त रुग्णांची संख्या 1 हजार 900 एवढी आहे. बाधितांमध्ये आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 9, नांदेड ग्रामीण 6, भोकर 1, कंधार 14, लोहा 1, मुदखेड 2, उमरी 1, किनवट 2, यवतमाळ 2, बीड 1 असे एकूण 53 बाधित आढळले. Take care Nandedkar; Fear of Corona growing up again!

92 कोरोना बाधितांना औषधोपचारानंतर सुट्टी देण्यात आलेली आहे. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे 3, मुखेड कोविड रुग्णालय 1, बिलोली तालुक्यातर्गंत 1, हिमायतनगर तालुक्यातर्गत 3, किनवट कोविड रुग्णालय 4, कंधार तालुक्यातर्गत 1, अर्धापूर तालुक्यातर्गंत 2, मनपा अंतर्गत एनआरआय भवन गृहविलगीकरण व जम्बो कोविड सेंटर 68, हदगाव कोविड रुग्णालय 2, खाजगी रुग्णालय 5, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे 2 व्यक्तींना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

362 कोरोनाबाधित रुग्णांवर औषधोपचार सुरु आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 8, जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल 23, हदगाव कोविड रुग्णालय 1, किनवट कोविड रुग्णालय 6, देगलूर कोविड रुग्णालय 3, मुखेड कोविड रुग्णालय व कोविड केअर सेंटर 2, नांदेड मनपा अंतर्गत गृह विलगीकरण 252, नांदेड जिल्ह्यातील तालुक्यांतर्गत गृह विलगीकरण 57, खाजगी रुग्णालय 10 व्यक्ती उपचार घेत आहेत. Take care Nandedkar; Fear of Corona growing up again!

Local ad 1