पुणे ः कोणालही आपले जास्त असावे आटत नाही. भल्ल्या-भल्यांना झिरो फिगरचा मोह आवरत नाही. आतापर्यंत सेलीब्रिटीसह धनधांडग्यांनी वजन घटविण्यासाठी शस्त्रक्रिया करुन घेतल्याचे आपल्या माहीत आहे. “पुणे तिथे काय उणे” म्हणत श्वानाचे वजन घटवण्यासाठी चक्क शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यात दिपीका या श्वानाचे शस्त्रक्रियेने पाच किलो वजन घटविण्यात आले. ही भारतातील पहिला शस्त्रक्रिया ठरली आहे. A dog underwent with obesity SURGERY IN PUNE
वजन कमी करण्यासाठी अनेक जण शस्त्रक्रियेचा पर्य़ाय निवडतात, हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, एका श्वानाने (कुत्रीने) आपले वजन कमी करण्यासाठी ‘लेप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रॅक्टॉमी’ शस्त्रक्रिया करून घेतली आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी कुत्र्यावर शस्त्रक्रिया होण्याची ही पहिलीच घटना आहे. हे ऐकल्यावर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. लठ्ठपणा हा आजार असून माणसांप्रमाणे कुत्र्यांमध्येही लठ्ठपणा वाढतोय. पुण्यात अशाच एका ५० किलो वजन असलेल्या एका कुत्र्यांवर वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. या शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभरात श्वानाच्या वजनात तब्बल पाच किलोनं घट झाली आहे. त्यामुळे आता श्वानाचे वजन ४५ किलो इतके झाले आहे. A dog underwent with obesity SURGERY IN PUNE
पुण्यातील कर्वेनगर येथील रहिवासी दारूवाला यांनी हा कुत्रा पाळला आहे. पाच वर्षांपूर्वी दिपिका घरी आल्यानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. सुरूवातीला ती घराच्या आसपास धावत राहायची, घरातील कामामध्येही मदत करत होती. कुटुंबातील इतर सदस्यांच्या सूचनेचेही पालन करत होती. परंतु, त्यानंतर तिला श्वास घेताना अडचण जाणवू लागली होती. श्वास घेता येत नसल्याने ती एकाच जागी बसून रेहायची. हे लक्षात आल्यानंतर त्यांनी औषधोपचार सुरू केले. दरमहा १० हजार रूपये औषधांसाठी खर्च करण्यात येत होतो. परंतु, तिच्या प्रकृतीत सुधारणा होत नव्हती. त्यानंतर सोशल मिडियावरून माहिती काढून कुटुंबियांनी पुणे येथील स्मॉल अॅनिमल क्लिनिकचे डॉ. नरेंद्र परदेशी यांची भेट घेतली. अतिरक्त वजन कमी करण्यासाठी आहारात बदल करून लैप्रोस्कोपिक स्लीव्ह गॅस्ट्रोनोमी शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. त्यानंतर डॉ. शशांक शहा यांच्याशी चर्चा करून शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमुळे श्वानाचं आयुष्यच बदलून गेलं आहे. A dog underwent with obesity SURGERY IN PUNE
डॉ. शशांक शाह म्हणाले, ‘‘माणसांप्रमाणे प्राण्यांमध्येही लठ्ठपणा हा आजार वाढतोय. व्यायामाची कमतरता, खाण्यापिण्याच्या व झोपण्याच्या वेळा अनिश्चित असल्याने प्राण्यांमध्ये वजन वाढू लागले आहे. देशात अनेक लठ्ठ पाळीव प्राणी आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणे आवश्यक आहे. लॅब्राडोर, गोल्डन रिट्रीव्हर, बॉक्सर, सेंट बर्नार्ड या भारतीय कुत्र्यांच्या प्रजाती असून त्यांना कार्बोहायड्रेटयुक्त अन्नपदार्थ जास्त प्रमाणात दिला जातो. या कुत्र्याच्या बाबतीतही अशीच परिस्थिती होती. माणसांप्रमाणे या कुत्र्याला लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदयरोग, सांध्यांचे विकार होते. श्वानाचे सरासरी आयुर्मान हे १२-१५ वर्ष असते. परंतु, लठ्ठपणामुळे श्वानाचे आयुष्य सहा वर्षांनी कमी झाले आहे.’’ A dog underwent with obesity SURGERY IN PUNE
डॉ. नरेंद्र परदेशी म्हणाले, ‘‘लठ्ठपणामुळे श्वानांचे सांधे कमकुवत होत असल्याने शारीरिक हालचाल मंदावते. या श्वानाच्या शरीरातील चरबीचे प्रमाण मोजण्यासाठी अनेक वैदयकीय चाचण्या करण्यात आल्या. शरीरातील चरबीनुसार श्वानाच्या आहारात बदलत करण्यात आला. याशिवाय औषधोपचाराद्वारे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. पण त्याचा श्वानावर कोणताही परिणाम झाला नाही. त्यानंतर श्वानाच्या मालकाशी चर्चा करून वजन कमी करण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.’’
‘‘६ जून २०२१ श्वानावर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. श्वानाला भूल देऊन ही शस्त्रक्रिया करण्यात आली. साधारणतः दोन तास शस्त्रक्रिया चालली. शस्त्रक्रियेपूर्वी १२ तास श्वानाला द्रव आहाराशिवाय काहीही खायला दिले नव्हते. साधारणतः प्रत्येक श्वानाचे वजन १८-२० किलो इतके असले पाहिजे. परंतु, या श्वानाचे वजन तब्बल ५० किलो एवढे होते. शस्त्रक्रियेनंतर श्वानाला सात दिवस चिकन सूपवर देण्यात येत होते. त्यानंतर अवघ्या पाच दिवसात श्वानाच्या वजनात पाच किलो घट झाली आहे. आता श्वानाचे वजन ४५ किलो आहे. सध्या श्वानाला व्यायामाचा सल्ला देण्यात आला आहे’’, असेही डॉ. परदेश म्हणाले. A dog underwent with obesity SURGERY IN PUNE
श्वानाचा मालक दारूवाला म्हणाल्या की, ‘‘शस्त्रक्रियेनंतर माझ्या कुत्र्याच्या आयुष्यात खूप चांगला बदल झाला आहे. आता तो पहिल्यासारखा घरी वावरत आहे. बर्याच पाळीव प्राणी मालकांना हे माहित नाही की बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया कुत्र्यांसाठी देखील उपलब्ध आहे. या निमित्ताने आता सर्वांमध्ये प्राण्यांमधील लठ्ठपणाबाबत जागरूकता निर्माण होईल. परंतु, प्राण्यांमधील लठ्ठपणा टाळण्यासाठी त्यांना गोड पदार्थ खायला देऊ शक्यतो टाळा.’’