(Do not sow) दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी पेरणी करुन नका
नांदेड ः गतवर्षी जूनमध्ये पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने दुबारचे संकट ओढवले होते. मात्र, यंदा हे संकट उद्भवू नये, याकरिता सरासरी 80 ते 100 मीमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी नका, असा सल्ला कृषी विभागाने शेतकऱ्यांना दिली आहे. (Do not sow to avoid double sowing crisis)
नांदेड जिल्हयातील खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाकडून करण्यात आली आहे.सन २०२१- २२ साठी जिल्ह्याला लागणा-या विविध वाणांच्या ८१ हजार ४३५ क्विंटल बियाणांची मागणी कृषी विभागाने केली आहे. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात आठ लाख हेक्टरच्यावर पेरणीचा अंदाज आहे. आगामी खरीप हंगामात जिल्ह्यात आठ लाख हेक्टरच्यावर पेरणीचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यानुसार खते, बियाणे तसेच इतर निविष्ठांच्या मागणीचे नियोजन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय तसेच जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. (Do not sow to avoid double sowing crisis)
जिल्ह्यात सर्वाधिक चार लाख हेक्टरवर सोयाबीनचा पेरा अपेक्षित असल्यामुळे कृषी विभागाने सोयाबीन बियाणाचे नियोजन या पूर्वीच केले होते. शेतक-यांना घरचे बियाणे राखून ठेवण्यासोबतच उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादन घेण्याचे आवाहन शेतक-यांना केले होते.यात सर्वाधिक ६५ हजार ६६६ क्विंटल सोयाबीन, तीन हजार ३३७ क्विंटल संकरित ज्वारी, तीन हजार ६७५ क्विंटल तूर, दोन हजार क्विंटल उडीद तर एक हजार क्विंटल मूग बियाणांची मागणी केल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली. (Do not sow to avoid double sowing crisis)
जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी किमान 80 ते 100 मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करु नये. अपुऱ्या ओलाव्या पर पेरणी केल्यानंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. 80-100 मिमी पाऊस झाल्यास पुरेशा खोलीवर ओलावा जातो. तसेच खंड पडल्यास पीक तग धरु शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असे आवाहन उपविभागीय कृषि अधिकारी आर.टी. यांनी केले आहे.