(Job) रोजगाराच्या शोधात असाल तर “ही” संधी तुमच्यासाठी

नांदेड : कोरोना प्रार्दुभाव वाढत असल्याने नांदेड जिल्ह्यातील बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, यासाठी नांदेड जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या विद्यमाने 14 ते 18 जून 2021 पर्यंत ऑनलाईन पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. If you are looking for a job then this is the opportunity for you

या मेळाव्यात नामांकीत कंपनीच्यावतीने बेरोजगार उमेदवारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी ऑनलाईन मुलाखती घेण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील जास्तीतजास्त बेरोजगार उमेदवारांनी www.rojgar.mahaswayam.gov.in  या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी केले आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दुरध्वनी क्रमांक 02462-251674 यावर सपंर्क साधवा. If you are looking for a job then this is the opportunity for you

ऑनलाईन मुलाखतीसाठी शैक्षणिक पात्रता दहावी, बारावी, कोणत्याही शाखेची पदवी किंवा आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. रोजगार मेळाव्यास ऑनलाईन अर्ज केल्यानंतर कंपनीचे प्रतिनिधी आपल्याशी ऑनलाईन (स्काईप,व्हॉटस्ॲप, फोन आदीद्वारे) संपर्क साधून आपली ऑनलाईन मुलाखत घेतील.

ऑनलाईन रोजगार मेळाव्यात सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांनी पुढीलप्रमाणे सहभागी व्हावे. http://www.rojgar.mahaswayam.gov.in/ या वेबसाईटवर नोकरी साधक (Job Seeker) म्हणून नोंदणी करावी. वेबसाईटवरील नोकरी साधक (Job Seeker) या लिंकवर क्लिक करावे. नोकरी उत्सुक उमेदवारांनी आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करुन लॉगीन बटणावर क्लिक करावे. प्रोफाईल मधील पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंकवर क्लिक करावे.

रोजगार मेळाव्याचा नांदेड जिल्हा निवडून Filter या बटणावर क्लिक करावे. आपल्याला नांदेड Nanded District Pandit Din Dayal Online Job Fair 1 मेळावा दिसू लागेल. त्यातील Action या पर्यायाखालील दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यात उपलब्ध रिक्त पदे दिसतील. दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यानंतर एक संदेश येईल. सदर संदेश काळजी पूर्वक वाचा व I Agree बटणावर क्लिक करावे. आपल्याला रोजगार मेळाव्यात उपलब्ध असलेली पदे (पदाचेनाव, शैक्षणिक अहर्ता, आवश्यक कौशल्ये, अनुभव, वयोमर्यादा, आरक्षण) दिसू लागतील.

आपल्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, कौशल्ये या नुसार पदाची निवड करावी व Apply बटणावर क्लिक करावे. आपल्याला एक संदेश दिसेल. हा संदेश काळजी पूर्वक वाचून ओक बटणावर क्लिक केल्यावर रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन सहभाग नोंदविला जाईल अशा प्रकारचा संदेश दिसू लागेल, अशी माहिती सहायक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी दिली आहे. If you are looking for a job then this is the opportunity for you

Local ad 1