(Relief) 2 हजार 819 ऑटोरिक्षा चालकांच्या बँक खात्यात जमा झाली आर्थिक मदत
नांदेड : कोरोनाच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने परवानाधारक ऑटोरिक्षा चालकांना दिड हजार रुपयांची आर्थिक मदत जाहिर केली होती. ती आतापर्यंत नांदेड जिल्ह्यातील 2 हजार 819 चालकांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले आहेत. तर 1 हजार 381 परवानाधारकांचे अर्ज पुर्ननोंदणीसाठी पाठविण्यात आले आहेत. Relief of ₹1,500 each to auto-rickshaw drivers
ऑटोरिक्षा परवानाधारकांना 1 हजार 500 रुपये सानुग्रह अनुदान बँक खात्यात ऑनलाईन पद्धतीने जमा करण्यात येत आहे. यासाठी https://transport.maharashtra.gov.in/…/Autorickshaw… या प्रणालीमध्ये रिक्षा परवानाधारकांनी स्वत:चे वाहन क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमांक आदी माहितीची नोंद करावी. नोंद केलेल्या माहितीची खात्री झाल्यानंतर अर्ज अनुदान खात्यामध्ये जमा होण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. Relief of ₹1,500 each to auto-rickshaw drivers
अर्ज करतांना अडचणी आल्यास प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अविनाश राऊत व वरिष्ठ लिपीक आर. एच. कंधारकर यांच्याशी कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस वगळून संपर्क साधावा, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी नांदेड यांनी केले आहे.