(Seed distribution) पाणलोट विकास प्रकल्पाच्या माध्यमातून प्रात्यक्षिकासाठी बियाणांचे वाटप
कंधार ः तालुक्यातील काटकंळबा येथे कृषी विज्ञान केंद्र सगरोळीच्या वतीने वातावरण बदलावार आधारित पाणलोट विकास प्रकल्पांतर्गत नाबार्ड व अटलास कापको कंपनीच्या आर्थिक सहयोगातून खरीप प्रात्यक्षिकासाठी शेतकऱ्यांना बियाणांचे वाटप करण्यात आले. Distribution of seeds for demonstration through watershed development project
कृषी विज्ञान केंद्र सगरोळी यांच्या शिफारशीनुसार हवामान अनुकूल बियाणे तूर उडीद – सोयाबीन व कापूस, मूग इत्यादी बियाणे 20 शेतकऱ्यांना वितरण करण्यात आले. सदरील वाण प्रात्याक्षिक प्रयोगासाठी निवडण्यात आले आहेत. हे वाण हवामान बदलास अनुकूल असल्याने पेरणी ते काढणी पर्यंत पिकांचा अभ्यास करून या वाणांचा प्रसार करण्यात येणार आहे. यासोबतच गावातील ८० शेतकऱ्यांना ट्रायकोडर्मा ही जैविक बिजप्रक्रिया औषध वाटप करण्यात आले. शेतकऱ्यांनी रासायनिक बिजप्रक्रियेसोबत जैविक बिजप्रक्रियेकडे वळावे हा मुख्य उद्देश या उपक्रमाचा आहे. Distribution of seeds for demonstration through watershed development project
यावेळी शास्त्रज्ञ डॉ. संतोष चव्हाण यांनी बिजप्रक्रिया पद्धत, अंतरपीक पेरणी व फळबाग लागवड या विषयावर उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. (Seed distribution)
🏻♂️ राज्यातील महत्वपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवर मोफत मिळविण्यासाठी mhtimes.in च्या वाॅट्सअप ग्रुपमध्ये सहभागी व्हा !*
https://chat.whatsapp.com/DxXQKBawQW98rtP7pfghfN