(Seven lakh) गावठी दारुसह सात लाखांचा मुद्देमाल जप्त
पुणे ः सासवड तालुक्यातील सिंगापूर गावच्या हद्दीत वाघापूर ते सासवड रस्त्यावर गावठी दारुची वाहतूक करणारी महिंद्रा बोलेरो पिकपसह एका आरोपिला अटक केली. यावेळी सहा लाख 68 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क सासवड विभागाने केली. (Seven lakh items including village liquor confiscated)
सासडव भागात गेल्या काही दिवसांपासून गावठी दारुची वाहतूक होत होती. त्यावर उत्पदन शुल्क विभागाचे अधिकारी पाळत ठेवून होते. सिंगापूर गावच्या हद्दीत वाघापूर ते सासवड रस्त्यावर गावठी दारूची वाहतूक करीत असताना महिंद्रा बोलेरो पिकप वाहनासह आरोपीला अटक करण्यात आली. (Seven lakh items including village liquor confiscated)