...

(Maha Arogya Skill) मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सहभागी व्हा ः अनुपमा पवार

पुणे  : कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची उभारणी करण्याकरिता जिल्हयामध्ये सन 2021 साठी ‘मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ राबविण्यात येणार अशी माहिती जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त अनुपमा पवार यांनी केले. Maha Arogya Skill Chief minister development Manpower

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या 15 ते 45 वयोगटातील युवक, युवतींना जिल्हयातील विविध शासकीय व खाजगी दवाखाने तसेच वैद्यकीय शिक्षण संस्थेमार्फत 1 हजार उमेदवारांना ऑन जॉब प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत देण्यात येणारे प्रशिक्षण हे उमेदवारांना पूर्णपणे नि:शुल्क असून प्रशिक्षण पश्चात प्रमाणीकरणासह रोजगार देखील सहजपणे उपलब्ध होऊ शकतो.

            प्रशिक्षणास सहभागी होण्याकरिता उमेदवारांनी  https://forms.gle/SdLLxFSSx45yB63G9 या लिंकवर उपलब्ध असणा-या गुगल फॉर्मच्या माध्यमातून आपली नोंदणी करणे आवश्यक आहे.


             जिल्हयातील अधिकाधिक उमेदवारांनी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा. तसेच याबाबत अधिक माहितीकरिता कार्यालयाच्या 020-26133606 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा punerojgar@gmail.com या ईमेलवर संपर्क साधावा असे आवाहन  सौ. अनुपमा उ.पवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता, पुणे यांनी केले आहे.  Maha Arogya Skill Chief minister development Manpower 

Local ad 1