(Mp navneet rana-kaur)खा.नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात ?

अमरावती : अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. नवनीत राणा यांनी सादर केलेले जात प्रमाणपत्र अवैध आहे. त्यामुळे येत्या सहा आठवड्यात त्यांनी सर्व प्रमाणपत्रं जमा करावेत, असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. तसेच या प्रकरणी खासदार राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. (Mp navneet rana-kaur)

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचीत जातींसाठी राखीव आहे. त्या मतदारसंघातून नवनीत राणा या निवडून आल्या होत्या. त्यांच्या या निवडीवर आक्षेप घेताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. अडसूळ यांच्या याचिकेवर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने खासदार नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र अवैध असल्याचे सांगितले आहे. त्यांना दोन लाख रुपये दंड आणि सहा आठवड्यात सर्व प्रमाणपत्रक जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. (Mp navneet rana-kaur)

खासदार नवनीत राणा यांचं जातप्रमाणपत्र न्यायमूर्ती धानुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने रद्द केले. हे प्रमाणपत्र घेताना त्यांनी खोटी आणि बनावट कागदपत्र सादर केली होती असे निरीक्षणही हायकोर्टांने नोंदविले आहे. त्यांना सहा आठवड्यांमध्ये जात प्रमाणपत्र जमा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. (Mp navneet rana-kaur)

Local ad 1