(Shiv swarajya din) शिवस्वराज्य दिन कौठा परिसरात साजरा
कंधार : तालुक्यातील शिरुर चौकी महाकाया, राऊतखेडा, धानोरा ग्रामपंचायत कार्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. राऊतखेडा येथे सरपंच महानंदा मडके व उपसरपंच प्रतिनिधी किरण गरजे, ग्रामपंचायत सदस्य संजीव डिकळे, मारोती कांबळे, मारोती मालेगांवे सतीश बारादे आदी प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते (Shiv swarajya din)
शिरुर ग्रामपंचायतीमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी सरपंच सुधाकर जाधव ग्राम विकास अधिकारी शिवाजी पानपट्टे, ग्रामपंचायत सदस्य पंढरी वाघमारे, साहेबराव गवाले, बळीराम पंदिलवाड,नारायन नवघरे, माधव जाधव, रघुनाथ जाधव,अंकुश जाधव, पांडुरंग पाटील, उमेश जाधव, सहदेव नवघरे, अशोक शिंदे, रंजित शिंदे, व्यंकट शिंदे, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील आदी उपस्थित होते. (Shiv swarajya din)
धानोरा (कौठा ) ता.कंधार ग्रामपंचायत कार्यालय प्रांगणात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला. (Shiv swarajya din)