...

(Pune railway police) लोहमार्गावर जखमी झालेल्या महिलेचा झोळीतून प्रवास

पुणे ः रेल्वे ट्रॅक ओलांडताना जखमी होऊन पडलेल्या एका महिलेला तब्बल चार किलोमीटर झोळीत उचलून नेऊन रुग्णालयात दाखल करून तिचे  लोहमार्ग पोलिसांनी प्राण वाचवले. आशा दाजी वाघामारे (वय.42,रा.थेरगाव फनसावाडी कार्ला) असे जखमी  महिलेचे असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. pune railway police news

सोमवारी ( दि.31 मे)  सकाळी अकराच्या सुमारास आशा वाघमारे ह्या जांबरुग गावाजवळ रेल्वे पटरी ओलांडत होत्या. त्यावेळी एका धावत्या रेल्वेगाडीची धडक बसल्याने त्यांच्या मनक्याला मार लागला. लोहमार्गावर त्या बराचवेळ पडून होत्या. दरम्यान, लोणावळा स्टेशन मास्तर यांना याची माहिती मिळाली. त्यांनी याबाबत लोणावळा दुरक्षेत्र लोहमार्गाला कळविले. pune railway police news

 पोलिस उपनिरीक्षक गोसावी व त्यांच्या पथक जखमी महिलेच्या मदततीसाठी पोलिस कर्मचारी व चार हमालांचे पथक कर्जत रेल्वेस्टेशनकडे जाणाऱ्या एका मालगाडीत बसून रवाना झाले. मदतीसाठी कर्जत लोहमार्ग ठाण्याचे काही कर्मचारी देखील दाखल झाले. महिला पडेलेला भाग दुर्गम असल्यामुळे रुग्णवाहिका तेथे पोहचू शकत नव्हती. शेवटी पोलिसांनी कपड्यांची झोळी करून महिलेला त्यामध्ये टाकले. त्यानंतर घटनास्थळापासून तब्बल चार किलोमीटर पायी चालत पळसदरी रेल्वेस्टेशन गाठले. तेथे रुग्णवाहिकेतून महिलेला कर्जत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. pune railway police news

मनक्याला गंभीर मार लागला असल्यामुळे महिलेला उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्या धोक्याच्या बाहेर आल्या. अपघात की घातपात असा संशय आल्यामुळे पोलिसांनी संबंधीत महिलेची चैकशी केली असता, रेल्वे पटरी अलांडत असताना, दुसऱ्या गाडीची धडक लागून आपण पडल्याचे सांगितले. ही कामगिरी पोलिस अधीक्षक वासये-पाटील, अपर पोलिस अधीक्षक कविता नेरकर-पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक एस.आर. गैड, पोलिस निरीक्षक गोसावी, कर्मचारी जाधव, गांगुर्डे, गायकवाड यांच्या पथकाने केली. pune railway police news

Local ad 1