(patient discharge) नांदेड जिल्ह्यात 86 हजार रुग्णांची कोरोनावर मात

नांदेड  : जिल्ह्यात आतापर्यंत 5 लाख 43 हजार 311 नमुण्याची तपासणी करण्यात आली.  त्यापैकी 4 लाख 42  हजार 517 अहवाहल निगेटिव्ह आले. आतापर्यंत 89 हजार 697 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले. तर त्यातील  86 हजार 137 जणांनी कोरोनावर मात केली आहे. एक हजार 889 जणांचा मृत्यू झाला आहे. nanded district corona patient discharge

मंगळवारी प्राप्त झालेल्या 3 हजार 179 अहवालापैकी  177 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. आजच्या घडीला 1 हजार 187 रुग्ण उपचार घेत असून 34 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. सोमवारी (31मे)शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी येथे उमरी येथील 25 वर्षाचा पुरुष, अर्धापूर तालुक्यातील 77 वर्षाचा पुरुष, तर 1 जून रोजी जिल्हा रुग्णालय कोविड हॉस्पिटल नांदेड येथे बिलोली येथील 65 वर्षाची महिला तर सिडको नांदेड येथील 45 वर्षाचा पुरुष, गाडीपुरा नांदेड येथील 65 वर्षाची महिला यांचा  उपचारा दरम्यान मृत्यू झाला. nanded district corona patient discharge

Local ad 1