(pune cantonment board) पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये लसीकरणातील राजकीय हस्तक्षेप थांबवा
पुणे ः पुणे कॅन्टोन्मेंट भागातील लसीकरणात होणारा राजकीय हस्तक्षेप होत आहे. तो थांबवावा, लसीकरण केंद्रांवर पोलिस सुरक्षा द्यावी, लसीकरणाची पुर्व नोंदणी ऑनलाईन करा, अशा विविध मागण्या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्या आहेत. (pune cantonment board covid vaccination centre)
लसीकरणाती विविध समस्यांविषयी शिष्ठमंडळाने मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार यांची भेट घेतली. त्यामध्ये शहर काँग्रेसचे सरचिटणीस संजय कवडे, कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे, राष्ट्रवादीचे कॅन्टोन्मेंट कार्याध्यक्ष निलेश कणसे, राजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष आगुरेड्डी व हिंदवी स्वराज्य संघाचे मोहन नारायणे यांचा समावेश होता. (pune cantonment board covid vaccination centre)