(World No Tobacco Day) तंबाखू सेवनाने होतायेत  गंभीर अजार

पुणे : गाव खेड्यापासून ते शहरांर्यत तंबाखू सेवन केले जाते. एकवेळी तंबाखू नाही मिळाले तर तो व्यक्ती बैचन होतो. तंबाखू सेवनाने होणारे नुकसान त्याच्या पुढीवर लिहले आहे. तरी तलप भागविली जाते. इंडस हेल्‍थ प्‍लसने केलेल्या पहाणीत धक्कादाय बाब समोल आली आहे. सीडीसी व डब्‍ल्‍यूएचओने देखील धूम्रपान व अधिक गंभीर स्‍वरूपाचा कोरना आजार होण्‍यामध्‍ये संबंध असल्‍याचे स्पष्ठ केले आहे. (World No Tobacco Day)

प्रतिबंधात्‍मक आरोग्‍य तपासणीमधील अग्रणी इंडस हेल्‍थ प्‍लसने एप्रिल २०१८ ते जानेवारी २०२१ पर्यंतच्‍या कालावधीसाठी अब्‍नॉर्मलिटी अहवाल सादर  केेला आहे. त्यात धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. महाराष्‍ट्रातील फुफ्फुसाच्‍या कार्यांसंदर्भातील चाचण्‍यांमध्‍ये अब्‍नॉर्मलिटीचे प्रमाण पुरूषांमध्‍ये जवळपास ३८ टक्‍के, तर महिलांमध्‍ये ४२ टक्‍के होते. पुण्‍यातील पुरूषांमध्‍ये हे प्रमाण ४८ टक्‍के, तर महिलांमध्‍ये ५३ टक्‍के होते. (World No Tobacco Day)

महिलांमध्‍ये धूम्रपान किंवा तंबाखू सेवन करण्‍याच्‍या वाढत्‍या प्रमाणामुळे त्‍यांच्‍यामधील अब्‍नॉर्मलिटी प्रमाणामध्‍ये वाढ झाली आहे. याव्‍यतिरिक्‍त अतिप्रमाणात धूम्रपान हे देखील लक्षणीय कारण आहे. संशोधनामध्‍ये एकूण 29 हजार 548 व्‍यक्‍तींचे सर्वेक्षण करण्‍यात आले, तर यामध्‍ये पुण्‍यातील 4 हजार 124 व्‍यक्‍तींचा समावेश होता. (World No Tobacco Day)

World No Tobacco Day
World No Tobacco Day


इंडस हेल्‍थ प्‍लसचे प्रीव्‍हेन्टिव्‍ह हेल्‍थकेअर स्‍पेशालिस्‍ट अमोल नायकवडी म्‍हणाले, फुफ्फुसाचे आजार असताना धूम्रपान केल्‍यास स्थिती लक्षणीयरित्‍या खालावू शकते. तसेच सध्‍याच्‍या  कोरोनाच्या प्रादुर्भावामध्‍ये स्थिती अधिक गंभीर होऊ शकते, कारण या आजारामधून बरे होण्‍यास वेळ लागत असल्‍यामुळे त्‍याचे प्रतिकूल परिणाम होऊ शकतात.  (World No Tobacco Day)

कोणत्‍याही प्रकारे तंबाखूच्‍या सेवनामुळे गंभीर स्‍वरूपात कोरोना आजार होण्‍याचा धोका वाढतो. तसेच यामुळे सीओपीडी, ब्रेन स्‍ट्रोक, हृदयाचा झटका, दमा, फुफ्फुसाचा कर्करोग, श्‍वसनविषयक आजार – इंटरस्टिशियल लंग डिसीज आणि मधुमेह अशा आजारांचा धोका देखील वाढतो. तरूण पिढी सहका-यांचा दबाव, स्‍टाइल स्‍टेटमेण्‍ट आणि तणावामुळे धूम्रपान व धूम्रविरहित तंबाखूचे सेवन करते. प्रबळ इच्‍छाशक्‍ती, वैद्यकीय समुपदेशन आणि तोंडी औषधोपचार धूम्रपानाच्‍या सवयीवर मात करण्‍यामध्‍ये मदत करतात. असे  नायकवडी यांनी निरिक्षण नोंदवले आहे. (World No Tobacco Day)

तंबाखूचे सेवन व धूम्रपान करणा-या व्‍यक्‍तींना सिगारेट्स ओढताना किंवा इतर तंबाखूजन्‍य उत्‍पादनांचे सेवन करताना विषाणूचा संसर्ग होण्‍याचा उच्‍च धोका आहे. धूम्रपान करणा-या व्‍यक्‍तींनाकोरोना आजार झाला तर त्‍यांना गंभीर आजार होण्‍याचा उच्‍च धोका असतो, कारण त्‍यांच्‍या फुफ्फुसाचे आरोग्‍य अगोदरपासूनच कमकुवत असते. याव्‍यतिरिक्‍त धूम्रपानाचे मानसिक व आर्थिक परिणाम देखील अत्‍यंत प्रतिकूल आहेत. ज्‍यामुळे, कोणत्‍याही प्रकारातील तंबाखूचे सेवन सोडल्‍यामुळे विविध आजार होण्‍याचा धोका कमी होईल आणि स्‍वास्‍थ्‍यपूर्ण व आरोग्‍यदायी जीवनशैली जगण्‍यास मदत होईल.    (World No Tobacco Day)

Local ad 1