(nanded corona update today) नांदेड जिल्ह्यात 150 व्यक्ती कोरोना बाधित

नांदेड : जिल्ह्यात 3 हजार 209 प्राप्त अहवालापैकी 150 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. त्यात आरटीपीसीआर तपासणीद्वारे 61 तर अँटिजेन तपासणीद्वारे 89 अहवाल बाधित आहेत. (nanded corona update today)

जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 89 हजार 367 एवढी झाली असून, यातील 85 हजार 640 रुग्णांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 1 हजार 372 रुग्ण उपचार घेत असून, 39 बाधितांची प्रकृती अतिगंभीर आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत जनतेने सहभाग घेवून मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर आणि लसीकरण याबाबत व्यापक जनजागृती करुन अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे. (nanded corona update today)

Local ad 1