(corona vaccine) नांदेड जिल्ह्यातील 91 केंद्रावर लसीकरण

नांदेड : कोरोना लसीकरण व्हावे यादृष्टिने लस सर्वत्र विभागून वितरीत करण्यात आली आहे. सोमवारी शहर आणि जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रांवर लस उपलब्ध असणार आहे. (corona vaccine)

मनपा क्षेत्रात मोडणार्‍या 8 केंद्रावर लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. त्यामध्ये श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाणा हैदरबाग,  शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको  या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. (corona vaccine)

उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली व भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. तर उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, ग्रामीण रुग्णालय बिलोली, हिमायतनगर, कंधार या केंद्रावर कोव्हॅक्सीनचे प्रत्येकी 100 डोस, ग्रामीण रुग्णालय मांडवी व उमरी या केंद्रावर कोव्हॅक्सीनेच 70 डोस, ग्रामीण रुग्णालय भोकर येथे कोव्हॅक्सीनचे 50, ग्रामीण रुग्णालय मुदखेड येथे कोव्हॅक्सीनचे 20 डोस उपलब्ध आहे. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध केले आहेत. (corona vaccine)

Local ad 1