(Goa-made foreign liquor seized) विदेशी मद्याचे 625 बॉक्स जप्त
मुंबई : गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६२५ बॉक्स आणि ट्रक असे एकूण ६७ लाख ५७ हजार रूपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने जप्त केले आहे. मद्यासह या पथकाने जप्त केला आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली ही कारवाई करण्यात आली. (Goa-made foreign liquor seized)
सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा लावला होता. ये-जा करणाऱ्या संशयित वाहांनीच तपासणी केली जात होती. गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या भारतीय बनावटीच्या विदेशी मद्याचे ६३५ खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे. (Goa-made foreign liquor seized)