(baramati taluka) बारामती तालुक्यात पाच ठिकाणी उत्पादन शुल्कची छापेमारी

पुणे ः  बारामती तालुक्यातील झारगडवाडी, घाडगेवाडी येथे बेकायदा सुरु असलेली गावठी दारुचे अड्डे उद्धवस्त केली आहेत. तर बेकायदा देशीदारुचा साठा जप्त केला आहे. या ठिकाणावरुन दोघांना अटक केली असून, 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जाप्त केला आहे.  (baramati taluka)


बारामती तालुक्यातील झारगडवाडी, घाडगेवाडी शिवारत बेकायदा गावठी दारुचे अड्डे सुरु होते. याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकार्‍यांना मिळाली. त्यानुसार अवैध देशी दारू,गावठी हातभट्टी दारू विक्री व निर्मिती केंद्रावर छापे टाकूण धडक कारवाई पाच गुन्हे दाखल केले आहेत. (baramati taluka) छापेमारीत गावठी दारुसाठी आवश्यक असलेले 3600 लिटर रसायण, 222  गावठी हातभट्टी दारू, देशी दारू 10.1 लिटर जप्त केले आहे.  गणेश शिवाजी जाधव व नशीब अजिनाथ भोसले हे देशी दारू व गावठी हातभट्टी विक्री करीत असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली.


ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतिलाल उमाप, संचालक अंमलबजावणी व दक्षता  श्रीमती उषा वर्मा, विभागीय उप-आयुक्त प्रसाद सुर्वे व अधीक्षक संतोष झगडे, उप अधीक्षक संजय जाधव यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई निरीक्षक विजय मनाळे, दुय्यम निरीक्षक डी.बी पाटील, दुय्यम निरीक्षक सागर भगत, दुय्यम निरीक्षक पी. एन. कदम, सहाय्यक दुय्यम निरीक्षक  विकास थोरात व डी. के.पाटील तसेच महिला जवान निलम धुमाळ, विजय विंचुरकर, अशोक पाटील,  दत्तात्रय साळुंके, रसुल कादरी, व झारगडवाडी चे सरपंच नितीन शेडगे, उपसरपंच वैष्णव बळी यांनी सहभाग घेतला. baramati taluka

baramati taluka
baramati taluka
Local ad 1