(A doctor treated his own village) ‘या’ डॉक्टरने गावाचे असे फेडले उपकार

उस्मानाबाद ः  कोरोना या अद्रश्य विषाणुनेमुळे सर्वजचण त्रस्त आहेत. तो कधीही आपल्याला जाळ्यात ओढेल, असे चित्र आहे. परंतु त्याची चिंता नकरता बाधितांवर उपचार करणारे डाॅक्टर, नर्सेस व इतर कर्माचारी आपण पहात आहोत. गावात जन्म घेतो, शाळा शिकतो त्यानंतर शहरात मोठ्या हुद्द्यावर कामालाही लागतो. गावाकडे कधी काही काम असेल तर जातो. ‘आईला व्हेंटिलेटर बेड हवा आहे, माझा ऑक्सिजन कमी झाला आहे, मला श्वास घेण्यास त्रास होतोय, बेडही मिळत नाही आता काय करू’ या प्रश्नांनी ते व्याकूळ झाले. बाधित रुग्ण गंभीर होऊ नयेसाठी काम करण्याचा त्यांनी चंग बांधला आणि  एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात त्यांनी थेट गावच गाठलं. कोरोनापासून गावकाऱ्यांना वाचविण्यासाठी सुट्टीच्या दिवशी पुणे तेे उस्मानाबाद हे 315 किलो मीटरचे अंतर पूर्ण करुन रुग्णसेवा करणारे साथरोग विभागात (मलेरिया) सहायक संचालक डॉ.जितेंद्र डोलारे ( Dr Jitendra Dolare ) यांच्याविषयी…  (A doctor treated the village)

कोरोनाची पहिली लाट ही शहरांपुर्ती मर्यादीत होती. परंतु दुस-या लाटेत ग्रामीण भागातही रुग्णसंख्या झपाटयाने वाढत गेली. परिणामी आपल्याकडील आरोग्य  यंत्रणा अपुरी पडत होती. त्यातच ग्रामीण भागात आरोग्य सुविधा नसल्याने शहरांच्या रुग्णालयांत बेड मिळविण्यासाठी धडपड केली जात होती. जे आपले मित्र, नातेवाईक शहरात रहातात. त्यांच्याकडे बेड उलब्धतेसंदर्भात विचारणा होत होती. अशीच विचारणा करणे फोन डॉ. डोलारे यांना ही येत होती. शहरातही बेड मिळणे कठीण होते. त्यामुळे डॉ. डोलारे यांनी आपले मुळ उस्मानाबाद तालुक्यातील केसेगाव येथील नागरिकांना मदत कशी करता येईल, यावर विचारमंथन केले. त्यातून सुट्टीच्या दिवशी पुणे ते उस्मानाबाद असे ये-जा करुन रुग्णसेवा करण्याचा निर्धार केला. (A doctor treated the village)


डाॅ. डोलारे म्हणाले, सुटीच्या दिवशी पुणे ते उस्मानाबाद असा 315 किमी चा प्रवास करून तब्बल 1400 संशयित रुग्णांची तपासणी केली. त्यातील 800 जण बाधित आढळले. तर आठ गंभीर रुग्णांना वेळेत उपचारासाठी जिल्ह्याच्या रुग्णालयात उपचार मिळाल्याने ते बरे झाले. आपण ज्या गावात शिकलो सवरलो त्या गावाची ओढ आपल्याला असतेच. अशातच कोरोनाची महामारी गावात शिरली आणि खेडेगावात कोराना आजाराच्या अज्ञानाने लोकांमध्ये प्रचंड घबराट पसरली. सरकारी रुग्णालयांत तपासणीसाठी गेले की चाचणी पॉझिटिव्ह येते आणि उपचारासाठी अ‍ॅडमिट झाल्यावर मृत्यू होतो आणि मृतदेहही देत नाहीत. या भितीने गावकरी तपासणी न करता लक्षणे वाटल्यास शेतामध्ये गोळया- औषधे न घेता राहत होती. यामुळे आजार वाढायचा. त्यांच्या मनातील गैरसमज दुर करून वेळेवर गोळया- औषधे दिल्याने गावकरी चांगले झाले. आता येथील साथ आटोक्यात आली आहे.  (A doctor treated the village)

  

बेडसाठी गावातून माला फोन येऊ लागले. त्यानंतर मी माझ्या वर्ग मित्रांकडे रेफर करायचे, ते उपचार करुन घरी पाठवायचे. परंतु रुग्णसंख्या मोठ्याप्रमाणत वाढली. त्यामुळे माझे वर्गमित्रही बेड उपलब्ध नसल्याचे उत्तर देत होते. त्यामुळे गावात जाऊन रुग्णांवर उपचार करण्याचा निर्धार केला. त्यानुसार गाव गाठले आणि उपचार सुरु केले. मी जाण्यापुर्व गावात आठ मृत्यू झाले होते. त्यामुळे नागरीक घाबरले होते. परिणामी उपचापासाठी रुग्णालयात जात नव्हते. रुग्णांचे समुपदेशन करुन त्यांना चाचण्या करालया पाठवलो. त्यानंतर उपचार सुरु कले, असे डाॅ. डोलारे यांनी सांगितले.

  गावाकडून डॉ. डोलारे यांना एप्रिल महिन्यात फोन कॉलचा भडीमार सूरू झाला. ‘आईला व्हेंटिलेटर बेड हवा आहे, माझा ऑक्सिजन कमी झाला आहे, मला श्वास घेता येत नाही, बेडही मिळत नाही आता काय करू’ या प्रश्नांनी ते व्याकूळ झाले. मात्र, बेड हवे अशी परिस्थिती येउच नये यासाठी काम करण्याचा त्यांनी चंग बांधला आणि  एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवडयात त्यांनी थेट गावच गाठले. 

असा होता दिनक्रम
  केसेगावातच एका ठिकाणी रुग्णांना तपासायला सुरवात केली. सकाळी 10 ते दुपारी दोन वाजेपर्यंत संशयितांना तपासायचे, कोविड लक्षणे असलेल्यांना नमुना तपासणी करायला पाठवायचे तसेच गोळया -औषधे द्यायचे. दुपारी गावात घरी जाउन त्यांच्या मनातील शंका समाधान करायचे.तसेच, सायंकाळी पुन्हा रुग्णांची तपासणी असा दिनक्रम होता.

डाॅ. डोलारे ठरले रुग्णांसाठी देवदूतगावात राहणाऱ्या लोकांमध्ये कोरोनाविषयी असलेले गैरसमज दुर करुन त्यांना चाचण्या करण्यास प्रवृत्त केल. त्यातून लवकर निदान झाल्याने त्यांना बरे करण्यात यश आले. भितीपोटी ते चाचणी न केल्यास धोका वाढतो. गावातच उपचार केल्याने रुग्णांना रुग्णालयाची पायरी चढावी लागली नाही. शहरात रुग्ण दाखल झाला की, ओपीडीच्या नावाखाली हजारो रुपये घेणारे डॉक्टर पाहायला मिळतात. त्यातच कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी लाखो रूपयांचे बिल नातेवाईकांच्या माथी मारले जात आहेत. नाईलाज असल्याने नातेवाईकही हतबल होतात. अशाच परिस्थितीमध्ये डॉ. डोलारे यांनी कुठल्याही साधनांविना रुग्णांचे समुपदेशन, औषधोपचार करणे, आवशकता भासल्यास सुविधा असलेल्या रूग्णालयात पाठवणे, असा त्रिसुत्री कार्यक्रम राबविली आहे. गावकाऱ्यांसाठी डाॅ. डोलारसे हे देवदूत ठरले आहे. 

   

doctor jitendra dolare

आम्ही शेतात राहतो. माझ्या आईचे वजन जास्त होते आणि मधुमेहाचा त्रास होता. पण वेळेवर उपचार दिल्याने आता माझी आईची तब्येत ठणठणीत आहे. गावासह इतर खेडयांतील रुग्णांना उपचार दिले. त्यांनी फार पुण्याचे काम केले आहे. ते आमच्यासाठी देवमाणुस आहेत.अगदी रात्री बारा – एक वाजता येउन रुग्णसेवा केली, अशा शब्दात सिद्राम वाघाळे (केसेगाव) यांनी भावना व्यक्त केल्या आहेत.

 असा राबवला कोरोनामुक्तीचा पॅटर्न
–  नागरिकांंच्या मनातील भिती, गैरसमज दुर केले
– गावातील तरूणांना एकत्र केले आणि त्यांना प्रशिक्षण देउन त्यांच्याद्वारे गावक-यांचे समुपदेशन केले
– कोरोनाबाबतचे माहितीची पत्रके वाटली
– गावक-यांमध्ये विश्वास निर्माण झाल्याने उपचार दाबून न ठेवता लोक उपचार घेऊ लागले.
– गृहविलगीकरणाचा सल्ला देत औषधेही लिहून दिली.
– आठ वयस्कर रुग्णांना दम लागणे, मधुमेह, रक्तदाब अशी गुंतागुंत असतानाही त्यांना घरात सलाईन लावत प्रसंगी जवळच्या जिल्हा रुग्णालयात पाठवून वैद्यकिय मदत मिळवून दिली.
– घाबरून खासगी रुग्णालयांत न गेल्याने नागरिकांचे लाख ते दीड लाख रूपये वाचले

Local ad 1