...

(mucormycosis patient) सर्वेक्षणात म्युकरमायकोसिसच्या संशयित रुग्णांचा शोध

पुणे : कोरोनातून (Corona) बरे झाल्यानंतरच्या पहिल्या महिन्यात म्युकरमायकोसिस (Mucormycosis) आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बऱ्या झालेल्या कोरोना रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण (Survey) करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. (mucormycosis patient in pune)

या सर्वेक्षणात म्युकरमायकोसिसच्या संशयित रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे. या संशयित रुग्णांची कान, नाक, घसा तज्ज्ञांमार्फत तपासणी करून प्रसंगी त्यांना उपचारासाठी रुग्णालयातही दाखल करण्यात येणार आहे. (mucormycosis patient in pune)

अनियंत्रित मधुमेह, स्टेरॉईडच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती कमी होणे, इम्युनोमॉड्युलेटर औषधांचा उपचारात वापर करणे. दीर्घ काळ अतिदक्षता विभागात उपचार चालू असणे, दीर्घकाळ आॅक्सीजनवरील उपचार, सहव्याधी, किडनी व यकृताचे जुने आजार, उपचारासाठी दीर्घकाळ उच्चप्रितजैविकांचा वापर, रुग्णाला दीर्घकाळ नळीद्वारे अन्नाचा पुरवठा करणे आदी प्रमुख कारणांमुळे म्युकरमायकोसिस हा आजार होऊ शकतो, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी म्हटले आहे.

पुणे शहर व जिल्ह्यात सध्या म्युकरमायकोसिस या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. यामुळे या आजाराला प्रतिबंध घालण्यासाठी वेळीच निदान आणि उपचार होणे गरजेचे आहे. लवकर निदान झाल्यास हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील संशयित रुग्णांचा शोध घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.

या सर्वेक्षणासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने नमुना फॉर्म तयार करण्यात आला आहे. या नमुन्यात रुग्णाचे नाव, गाव, कोरोनातून केव्हा बरा झाला, उपचारामध्ये स्टेरॉईडचा वापर झाला का, संबंधित रुग्णाचे वय, कोणती सहव्याधी आहे का आणि कोरोनातून बरे झाल्यानंतर कोणती लक्षणे दिसताच, याची माहिती रुग्णाच्या घरी जाऊन भरून घेतली जाणार आहे. हे सर्वेक्षण येत्या २७ मेपर्यंत पूर्ण केले जाणार आहे. म्युकरमायकोसीसच्या लक्षणांवरून संशयित रुग्णांचा शोध घेतला जाणार आहे.

ही आहेत म्युकरमायकोसिसची लक्षणे

– डोळे दुखणे

– नाक बंद होणे

– चेहऱ्यावर बधिरता येणे

– कमी दिसणे किंवा दोन प्रतिमा दिसणे

– डोळ्याला सूज येणे

– डोळा लाल होणे

– डोळे दुखून उलटी होणे

– रुग्णाच्या वागण्यात बदल होणे

– नाकातून रक्त किंवा काळा स्त्राव येणे

Local ad 1