(vaccination booth) मंगळावारी नांदेड जिल्ह्यातील 91 केंद्रावर लसीकरण होणार
नांदेड : जिल्ह्यातील 91 लसीकरण केंद्रांवर मंगळवारी कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार आहे. मनपा क्षेत्रातील आठ केंद्रावर कोविशील्ड या लसीचे डोस उपलब्ध असणार आहेत. श्री गुरु गोविंदसिंघजी जिल्हा रुग्णालय, डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय, शासकिय आयुर्वेदीक महाविद्यालय, शहरी दवाखाना हैदरबाग, शिवाजीनगर, जंगमवाडी, कौठा व सिडको या 8 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. (nanded district 91 vaccination booth)
उपजिल्हा रुग्णालय गोकुंदा, मुखेड, हदगाव, देगलूर, ग्रामीण रुग्णालय धर्माबाद, हिमायतनगर, कंधार, मांडवी, लोहा, माहूर, मुदखेड, नायगाव, उमरी, बारड, बिलोली, भोकर या 16 केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येक केंद्रनिहाय 100 डोस उपलब्ध करुन दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व 67 प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोविशील्डचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध असणार आहेत. जिल्ह्यात 23 मे पर्यंत एकुण 4 लाख 15 हजार 861 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. तर 24 मे पर्यंत कोविड-19 लसीचासाठा पुढीलप्रमाणे प्राप्त झालेला आहे. कोविशिल्डचे 3 लाख 49 हजार 530 डोस, कोव्हॅक्सीनचे 1 लाख 5 हजार 500 डोस याप्रमाणे एकुण 4 लाख 55 हजार 30 डोस प्राप्त झाले आहेत. nanded district vaccination booth