(Rain Weather Forecast) खुशखबर… मान्सून अंदमानात ; महाराष्ट्रात 8 ते 10 जून दरम्यान अगमन
पुणे ः अंदमान आणि निकोबार बेटांवर मान्सून वेळेत दाखल झाला आहे. तर १ जून रोजी तो केरळमध्ये दाखल होईल. तसेच महाराष्ट्रात प्रथम तळकोकणात ८ ते १० जून दरम्यान दाखल होईल. त्यानंतर उर्वरित राज्यात १५ ते २० जून पर्यंत येईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे. Monsoon Maharashtra Rain Weather Forecast
अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाने केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात या पश्चिम किनारपट्टी लगतच्या राज्यांना तडाखा दिला. याच दरम्यान मॉन्सूनला अनुकूल असे वातावरण तयार झाले होते. अखेर शुक्रवारी (ता.२१) नैर्ऋत्य मोसमी पावसाचे (मान्सून) अंदमानात दमदार आगमन झाले. पुढील ४८ तासांमध्ये अंदमानसह बंगालच्या उपसागराच्या आग्नेय, नैर्ऋत्य भागात मोसमी पावसाची वाटचाल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. Monsoon Maharashtra Rain Weather Forecast