(Farmers) शेतीत नवे प्रयोग करत असाल तर तुम्हांला मिळेल शासनाचा पुरस्कार

नांदेड : राज्यात दरवर्षी शेती व पुरक क्षेत्रात नवनवीन प्रयोग तसेच पारंपारीक शेतीमध्ये उल्लेखनिय कार्य करणा-या शेतकऱ्या्ंना किंवा संस्थेस राज्य शासनाच्या कृषि विभागामार्फत विविध पुरस्कार राज्यपालांच्या हस्ते प्रदान करुन सन्मानित केले जाते. तुम्हाही शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करुन उल्लोखनीय काम करत असाल तर पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करता येईल. (Farmers)

शेतकरी गट/संस्था यांनी या पुरस्काराच्या मार्गदर्शक सुचनांच्या अधिन राहुन कृषि पुरस्कारासाठी आपला परीपुर्ण प्रस्ताव कृषी विभागाच्या नजीकच्या कार्यालयात 30 जुन पर्यंत सादर करावा. विविध कृषि पुरस्कारांच्या मार्गदर्शक सुचना कृषि विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी आपल्या गावचे कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. राज्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी पुरस्कारांसाठी प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन मा.आयुक्त (कृषी ) यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना केले आहे. (Farmers)

पुरस्काराचे नाव आणि रक्कम
डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार- एक (राज्यातून एक) पुरस्काराची रक्कम 75 हजार. वसंतराव नाईक कृषिभुषण पुरस्कार- 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण रक्कम 50 हजार. जिजामाता कृषिभुषण पुरस्कार- 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकुणरक्कम 50 हजार. कृषिभूषण (सेंद्रिय शेती ) पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण
रक्कम 50 हजार. युवा शेतकरी पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण रक्कम 30 हजार.


वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण रक्कम 30 हजार. उद्यान पंडीत पुरस्कार 8 (आठ कृषि विभागांतून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण रक्कम 25 हजार. वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार-40 (सर्वसाधारण गटासाठी प्रति जिल्हा 1 याप्रमाणे 34 आणि आदिवासी गटासाठी प्रति विभाग 1 याप्रमाणे 6 असे एकुण 40) रक्कम 11 हजार. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार-9 (आठ कृषि विभागातून प्रत्येकी 1 अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे 8 तसेच कृषि आयुक्तालय स्तरावरून एक अधिकारी-कर्मचारी याप्रमाणे एकंदर एकूण 9) याप्रमाणे पुरस्काराचे स्वरुप राहिल.

Local ad 1