(Teacher) “सर तुमच्या जाण्याने आम्ही पोरके झालो”
कंधार तालुक्यातील कौठा येथील जनता हायस्कुलचे सेवानिवृत्तमुख्याध्यापक तथा जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक काशिनाथ गोविदराव देशमुख(के.जी. सर) नावाने परिचित असलेले विद्यार्थी प्रिय शिक्षक. शांत, सयंमी, मित्तीभाषी ते वर्गात येताच टाचनीपडली तरी आवाज येईल, अशी भयाण शांतता असायची. कारण त्याची आदरयुक्त भितीविद्यार्थ्यांमध्ये होती. त्यांच्याकडे शिकलेली अनेक विद्यार्थी डाँक्टर, अभियांता,शिक्षक व अन्य विविध पदांवर कार्यरत आहेत.गुरुजीचं आचानक जाण हे आम्हां विद्यार्थ्यांसाठी न भरुन निघणारी पोकळी निर्णामझाली. त्यांनी आम्हांला दिलेल्या शिक्षणरुपी शिदोरीच्या बळावर अनेकांचे जिवन बहरले.त्यातलाच मी एक विद्यार्थी असून, गुरुजी तुनच्या जाण्याने आम्ही पोरके झाले आहोत.देहरुपी तुम्ही आमच्यातच नाही, मात्र, तुम्ही दिलेले विद्येच्या रुपात प्रत्येकक्षणो-क्षणी सोबत असणार आहात. (Teacher)
जनता हायस्कुल कौठा येथील 9 वी 10 वी वर्ला गणित शिकवणारे के. जी. सर म्हणजे माझ्या शालेय जीवनात कोणतीच शिक्षा न करता विद्यार्थ्यांना सिस्त लावणारे, सिस्तीत अध्यापन करणारे आणि त्यांच्या 35 मिनिटांचा तास असयाचा. गणित विद्यार्थ्यांना समजून सांगत असे, नंतर त्यांना परत समजावुन सांगायची गरज भासायची नाही. सरांच्या अध्यापणाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, हजारो विद्यार्थी कर्मचारी झाले, डॉक्टर, इंजनियर झाले. परंतु सरांनी कधी कोणत्याही विद्यार्थ्यासोबत दुजाभाव केला नाही. हुशार गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी अनेक प्रकारे मदत केली, मार्गदर्शन केले, शाळेचे मुख्यध्यापकपदही त्यांनी सांभाळल आणि त्यांनी आपल्या काळाच काळात शाळा नावारूपास नेली. सरांनी त्यांच्या जीवनात अनेक कार्य केले, त्यांच्या कार्याला सलाम… (Teacher)
गणित शिकवण्यात कोणते सर चांगले म्हटलं तर अलगद आपण आपल्या तत्कालीन शिक्षकांच नाव सांगतो, प्रत्येक जन के.जि.सर म्हणायचे. के.जि. सर यांनी तर आयुष्यभर पुरेल अशी माया, आपलेपणा आपल्याला दिला, सर गेले हे ऐकुन डोळे तर पाणावलेच, शिवाय आपल्या एका जवळच्या परिवारातील व्यक्तीला गमावल्याच दुःख झालं, जे शब्दात व्यक्त करणं अशक्य आहे. (Teacher)
सरांच्या बोलण्यातील आपलेपणा, त्यांचं अध्यापन त्यांनी आपल्याला जवळ बोलावून लाड करत पाठीवर हात ठेवून समजून सांगितलेले, मार्गदर्शन केले, ते आवाज, त्यांच ते प्रेम, वात्सल्य असं उदार अंतःकरण ईश्वर प्रत्येकाला देवो हीच प्रार्थना. सर म्हणजे एक भीष्म पितामह होते, त्यांच्या मृतात्म्याला अनंत काळ शांती मिळो, अशा शब्दात के. जी. सरांचा विद्यार्थ्यी नुरुद्दीन सय्यद यांनी आपल्या भावनांना वाट करुन दिली. (Teacher)