(indian army soldier)“देशमुख सरांमुळेच मी भारतीय सैन्यात”

पालकांपेक्षा मुलांवर शिक्षकांचा अधिक प्रभाव असतो, हे वेळेवेळी समोर आलं आहे. मुले २४ तासांपैकी केवळ आठ तास शिक्षकांच्या सानिध्यात रहातात. शिक्षणाबरोबरच आयुष्य जगण्याची कला ते आत्मसात करतात. घरची आर्थिक परिस्थिती बिकट होती, वडील दुसऱ्याकडे कामाला होते. त्यामुळे घरी असलेली जनावरे चारालयला जावे लागायचे परिमाणी शाळेला दांडी मारावी लागायची, ही बाब काशिनाथ देशमुख सरांच्या लाक्षात आली. त्यावेळी त्यांनी दिलेला सल्ला माझ्या आय़ुष्याला कलाटणी देणार ठरला… कंधार तालुक्यातील कौठा येथील जनता हायस्कूलचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ देशमुख यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यानंतर त्यांचा विद्यार्थ्यी भारतीय सैन्यात असलेला भगवान मंगनाळे आणि बालाजी डाके जाकापूरकर यांनी आपल्या गुरुबद्दल व्यक्त केलेल्या भावना त्यांच्याच शब्दात.… (indian army soldier)

“सन २००० हे शैक्षणिक वर्षात माझी इयत्या दहावी होती. घरची आर्थिक परिस्थिति बिकट होती. त्यामुळे मी अधुनमधून दुपारी शाळेला दांडी मारायचो.  त्याला कारण तसेच होते. घरी गाई होत्या,  वडील दुसर्याच्या घरी कामाला होते. त्यामुळे गाई घेऊन रानात जाव लागायच. काशिनाथराव देशमुख सरांनी खुप वेळा मला समजुन सांगितले. पण मला पर्याय नव्हता. सर नेहमी म्हणायचे परिस्थितवर मात करण्यासाठी शिक्षण घेणं गरजेच आहे आणि तु शिक्षणाव्यतिरिक्त भटकु नको. दर्जेदार शिक्षण घेतलास तर तुझे येणारे दिवस सोनेरी असतील. सराचे हे बोल माझ्या अंतरमनाला लागले आणि मी जोमाने आभ्यासाला लागलो. सरांना माझ्यातील बदल दिसुन आला. बोर्डाची परिक्षा तोंडावर आली आणि माझ्याकडे अपेक्षित किंवा नवनीत घेण्यासाठी देखील पैसे नव्हते, त्यावेळी सरांनी शाळेला आलेले अपेक्षित संच मला दिले. आज मी देशमुख सरांच्या मार्गदर्शनामुळे आणि मदतीमुळे भारतीय सैन्यात आहे. सर आपण अस अचानक सोडुन गेलात, आम्हाला मोठा अघात झाला. मन बेचैन झाल. आपल्या आत्म्यास शांती लाभो…” अशा शब्दात भगवान मंगनाळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. (indian army soldier)

के. जी. देशमुख सर यांचा उल्लेख ” शेकडो विद्यार्थ्यांना घडवणारे गुरुजी” असाच करावा लागेल. गणित म्हणजे काशिनाथराव देशमुख सर हेच समीकरण झाले होते. त्याकाळी…1986 पूर्वी  सर डोणवाडा येथे सेवेत होते. त्या काळी अपडाऊनच्या फारशा सुविधा नव्हत्या. म्हणून सर तिकडेच मुक्कामी असायचे. शनिवार, रविवार गावी येत असत. शिकवणी वर्ग घेणारे इतर कोणीही नव्हते. मुलं वाट पाहत बसायची.. शनिवारी चार वाजता आणि रविवारी सकाळी सात वाजता वर्ग भरायचा भरायचा.  

    सर ड्युटी संपवून, प्रवास करून आले, तरी फ्रेश मूडने  शिकवायला सुरु करत असे. आठवड्यात दोन दिवस  वर्ग चाले. तरी पण अभ्यासक्रम पूर्ण होत असे. मुले मन लावून समजून घेत.. उदाहरणं सोडवायचा प्रयत्न करत. ते मुलांवर कधी रागावल्याचे आठवत नाही. त्यांनी अनेकांना घडवले. त्यांचे बरेच विद्यार्थी आज विविध पदावर कर्तव्य बाजवत आहेत.

    स्व. मुद्दे सर, नागेश सावकार यन्नावार सर आणि के. जी. देशमुख सर ही त्रिमूर्ती म्हणजे गणित विषयाची तज्ज्ञ मंडळी.. या तिघांच्या हाताखाली गणित शिकायला मिळाले, हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल.. यांचा हात कोणी धरू शकत नव्हते. मुद्दे सरांचा तर तालुक्यात दबदबा होता… सर्वांनाच त्यांची आदरयुक्त भीती असायची.. शिक्षकही थर्रर्रर्र कापायचे… अशा ह्या महान हस्तीं.. 1986 ला नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये संस्थेचे अध्यक्ष भागवत सावकार आणि सचिव अशोकराव देशमुख साहेब यांनी प्रयत्न करून के. जी. सरांची बदली जनता हायस्कूल कौठा येथे करवून घेतली. एका संस्थेतल्या शिक्षकाची बदली दुसऱ्या संस्थेत होत नाही, पण हे घडले. शाळेचा कायापालट झाला.

    आमची दहावीची बॅच चालू असताना के.जी. सर बदली होऊन आले आणि आम्ही त्यांचे विद्यार्थी झालो. सर येण्यापूर्वी मुद्दे सर दहावीला गणित शिकवत असे.. कामाचा व्याप आणि उतरते वय यामुळे  त्यांचे तास दररोज होत नसे. बऱ्याच वेळा नागेश सावकार तास घेत. तेव्हा ते नोकरीला नव्हते. के. जी. सरांच्या रूपाने आम्हाला गणिताचा पूर्ण वेळ शिक्षक मिळाला. आता आमचे ट्युशन पण दररोज होऊ लागले. उदाहरणांचा इतका सराव होत असे की, कोणत्या प्रश्नाचे काय उत्तर येते हे उदाहरण दिल की लक्षात यायचं.
 

   शाळेत क्लास, चार नंतर ट्युशन तरी पण जानेवारी 1987 ला सरांनी दहावी बॅचसाठी रात्री स्पेशल क्लास घेण्याचे जाहीर केले. वेळ रात्री आठ ते नऊ.. मुलांची चांगली तयारी व्हावी हा त्यांचा उद्देश होता. नंतरच्या जीवनात देखील सरांचे  मार्गदर्शन लाभले.. सुट्टीत गावी आल्यावर  सरांना भेटल्या शिवाय राहत नसे.  मुख्याध्यापक म्हणून देखील त्यांनी आपल्या कामाची वेगळी छाप पाडली. आज सर आपणास सोडून गेल्याची बातमी कळाली… मन बधिर झाले.. सगळे काही सुन्न… सर, आता आपले दर्शन होणे नाही, ही कल्पना देखील असह्य होत आहे..  आपल्या आत्म्यास शांती लाभो, अशा शब्दात बालाजी डाके जाकापूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. 

Local ad 1