...

शिवानी रोहन सुरवसे पाटील यांचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मान

पुणे, पुण्यासह अन्य जिल्हयांमघ्ये आरोग्य आणि पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनिय केलेल्या कामाची दखल घेत महिला राज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शिवानी रोहन सुरवसे – पाटील यांना नवभारत वृत्त समुहाच्या दै.नवराष्ट्रचा आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बारामती ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार (Sunanda Pawar, trustee of Baramati Agricultural Development Trust), अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड (Actress Prajakta Gaikwad), चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले (Meghraj Raje Bhosale) यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले. (Shivani Rohan Suravase Patil honored with the Ideal Social Worker Award)

 

पुण्यात काँग्रेसला मोठा झटका : युवक काँग्रेस सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांचा ही राजीनामा !

 

गरीब व गरजू रुग्णांसाठी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना असतात. मात्र, त्यांना त्याची माहिती नसल्याने उसनवारी करुन उपचार घेतले जातात. त्यातून संपूर्ण कुटुंब कर्जबाजारी होतो. शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येकाला असली पाहिजे, तसेच त्यांना मोफत व अल्पदरात उपचार मिळाले पाहिजे, यासाठी महिलाराज फाउंडेशन गेल्या सहा वर्षापासून पुण्यासह अन्य सहा जिल्ह्यांमध्ये प्रयत्न करत आहे. गरीब गरजू रुग्णांना शासनाच्या योजनेच्या लाभातून उपचार मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु असून, आतापर्यंत तब्बल 7500 हजार रुग्णांना वेगवेगळ्या पातळीवर मदत करता आली, याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया महिलाराज फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा शिवानी रोहन सुरवसे – पाटील यांनी दिली आहे.

घरातील व जवळच्या व्यक्तींना आरोग्य विषयक आलेल्या अडचणीतून अनेक गोष्टी शिकता येतात. आपल्या प्रमाणे इतरांना अडचणी येऊ नये यासाठी महिलाराज फाउंडेशनची स्थापना 2019 मध्ये करण्यात आली. सुरुवातील पुणे शहर आणि जिल्ह्यातील रुग्णांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊन उपचार दिले जात आहे. आतापर्यंत छोट्याश्या छोट्या उपचापासून ते गंभीर आजार असलेल्या सुमारे साडेसात हजार रुग्णांना मोफत आणि अल्प दरांमध्ये उपचार मिळवून दिले आहेत. सध्या या सेवेचा विस्तार करण्या आला असून, पुण्यासह सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, ठाणे, रायगड आणि नवी मुंबई जिल्ह्यांमध्य महिलाजार फाउंडेशनचे काम सुरु करण्यात आले आहे. सध्या सुमारे 800 स्वंयसेवक फाउंडेशनमध्ये काम करत असून, येणाऱ्या काळात राज्यभर याचा विस्तार करण्याचा विचार आहे, असे शिवानी रोहन सुरवसे – पाटील यांनी सांगितले आहे.

 

Local ad 1