गोल्फ खेळ देशातील सर्व घटकापर्यंत पोहचला पाहिजे – अनिरुद्ध सेवलेकर
पुणे. गोल्फ खेळ हा अतिशय दर्जेदार असून, तो देशातील सर्व घटकापर्यंत पोहचला पाहिजे, असे मत गोल्फ इंडस्ट्री असोसिएशन चे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ऑक्सफर्ड ग्रुप चे संस्थापक अनिरुद्ध सेवलेकर (Aniruddha Sewlekar, National President of Golf Industry Association) यांनी व्यक्त केले. पुण्यात होणाऱ्या राष्ट्रीय गोल्फ ऑक्सफर्ड प्रीमियर लीगचे (National Golf Oxford Premier League) उद्घाटन त्यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्टचे रोहन सेवलेकर, एस गोल्फिंग चे आदित्य मालपाणी, ऑक्सफर्ड रिसॉर्टचे व्यवस्थापक कौशिल वोरा व सर्व संघाचे खेळाडू उपस्थित होते. (national golf oxford premier league starts)
What is a charity hospital? । धर्मादाय रुग्णालय म्हणजे काय ? ; रुग्णाला उपचार कसे मिळतात ?
गोल्फ खेळाची देशातील सर्वात महत्त्वपूर्ण आणि नावाजलेली अशी स्पर्धा समजली जाते. ही स्पर्धा 6 ते 13 एप्रिल दरम्यान पुण्यात होत आहे. या स्पर्धेत 16 संघ आणि 180 ते 250 खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ 13 एप्रिल 2025 रोजी पुण्यातिल ऑक्सफर्ड गोल्फ रिसॉर्ट आणि क्लब येथे पार पडणार आहे.
सेवलेकर म्हणाले, अतिशय नावाजलेल्या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑक्सफर्ड प्रिमीअर लीगला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. देशभरातील विविध संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे ऑक्सफोर्ड गोल्फ लीग (Aniruddha Sewlekar, founder of Oxford Group) मध्ये पुणेकराना अतिशय चुरशीचे गोल्फ सामने पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय लीगच्या सामन्यासाठी नोंदणीला अनेक गोल्फ खेळाडू आणि संघानी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला आहे.
लिगमध्ये सहभागी संघ
ईगल फोर्सेस, बिनधास्त बॉईज, सुलतान स्विंग्स, ब्लिस्ट्रिंग बर्ड्स, झिंगर्स,ग्रीन गॅडीटर्स, सुजलोन ग्रीन्स, रोरिंग टायगर्स, पुना लायन्स, सुब्बन सनरायजर्स, द लीगशी क्लब, बर्डी स्कॉड यासारखे मातब्बर संघ सहभागी झाले आहेत. त्यामुळे यावर्षीच्या ऑक्सफर्ड गोल्फ लीग च्या स्पर्धा अतिशय चुरशीच्या आणि रंगतदार होणार असल्याचे आयोजक रोहन सेवलेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढील सात दिवस या स्पर्धा सुरू राहणार आहेत.