नांदेड जिल्ह्यासाठी पुढील दोन दिवस पावसाचा यलो अलर्ट
विजेच्या कडकडाटासह पाऊस व वादळी वारे वाहण्याचा अंदाज
Yellow alert नांदेड : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार 2 व 3 एप्रिल 2025 हे दोन दिवसासाठी यलो अलर्ट जारी केलेला आहे. या दोन दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी 40 ते 50 किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधित यंत्रणा व नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने केले आहे. (Yellow alert for rain for the next two days for Nanded district)
केंद्र सरकारने अखेर स्मार्ट सिटी प्रकल्प गुंडाळला ; सर्व प्रकल्प महापालिकांकडे होणार वर्ग