पुणे. नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगा व-मंचर- चाकण – पुणे हा सरळमार्ग सोडून शिर्डी-अहिल्यानगर मार्गे पुणे-नाशिक रेल्वे नेण्याचा जो घाट घातला जातोय, हे अत्यंत दुर्दैवी आहे. (Pune – Nashik Semi High Speed Railway) पुणे मध्यरेल्वे व्यवस्थापकांनी नवीन मार्गाचा DPR तयार करण्याची प्रक्रिया सुरु असल्याच स्पष्ट केल्यावर आता सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून आपल्याला लढा आणखी तीव्र करावा लागणार आहे, असे ट्विट विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांनी म्हटले आहे. (Opposition to the new route of Pune-Nashik semi-high speed railway)
पुणे ते नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग प्रस्तावित असून, त्याचा प्रकल्प आराखडा तयार केला जात आहे. मात्र, त्याचा मार्ग बदलण्यात आला आहे. पुर्वी हा मार्ग नाशिक-सिन्नर-संगमनेर-नारायणगा
का होतोय विरोध
- पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प सरळमार्गे न केल्यास वाढणारे अंतर जवळपास ७०-८० किमी आहे, तर वाढणारा वेळ हा जवळपास दीड तास जास्त आहे. हा प्रकल्प सरळमार्गे न केल्यास “सेमी हायस्पीड” हा मूळ उद्देश फोल ठरेल.
- पुणे – नाशिक – मुंबई हा सुवर्ण त्रिकोण साध्य करण्यासाठी पुणे – नाशिक रेल्वे प्रकल्प सरळ मार्गानेच होणे गरजेचे आहे.
- GMRT मुळे निर्माण होणारी अडचण बोगदा किंवा इतर पर्यायाने सोडवता येणे शक्य आहे.
- पुणे – नाशिक महामार्गावरील वाढते औद्योगीकरण व शहरीकरणामुळे वाहतूक कोंडीची समस्या गंभीर झाली आहे.
- पुणे – अहिल्यानगर सेमी हायस्पीड रेल्वेला विरोध नाही, मात्र ती पुणे – नाशिक मार्गाला पर्याय असू शकत नाही.