नांदेड : नांदेड जिल्ह्याचे नवे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले (District Collector Rahul Kardile) यांनी गुरुवारी सकाळी रुजू झालेत.पूर्व जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला. यावेळी त्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत स्वागत झाले. यावेळी मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत (District Collector Abhijit Raut) यांच्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल (Nanded Zilla Parishad Chief Executive Officer Minal Karanwal), महानगरपालिका आयुक्त डॉ. महेश डोईफोडे (Municipal Commissioner Dr. Mahesh Doifode) सहाय्यक जिल्हाधिकारी मेघना कावली (Assistant District Collector Meghna Kavali), अतिरिक्त जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर( Additional District Collector Pandurang Borgaonkar), निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर (Resident Deputy District Collector Mahesh Vaddakkar), सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. (Rahul Kardile takes charge as District Collector of Nanded)
वाढलेल्या विमान भाड्यांवर नियंत्रण आणावे – युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे
मावळते जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची छत्रपती संभाजी नगर येथे वस्तू व सेवा कर सहआयुक्त पदावर बदली झाली आहे. अभिजीत राऊत गेल्या अडीच वर्षापासून नांदेड येथे जिल्हाधिकारी पदावर कार्यरत होते.