...

दुय्यम निबंधक कार्यालयात नागरिकांची गैरसोय ; प्रशासनाचे दुर्लक्ष

युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे यांनी वेधले लक्ष

पुणे : राज्याच्या तिजोरीत सर्वाधिक महूसल देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र कार्यालयाच्या (Registration and Stamps Department Maharashtra) सर्वच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये दस्त नोंदणीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून, या गंभीर समस्येकडे युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे (Youth Congress State General Secretary Rohan Suravase) यांनी लक्ष वेधले आहे. सुरवसे यांच्या टीमने पुणे शहरासह राज्यातील बहुतांश दुय्यम कार्यालयाची माहिती घेतली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आली आहे. दस्त नोंदणीसाठी कार्यालयामध्ये आलेल्या नागरिकांना  साधी बसायची सोय उपलब्ध नाही. (citizens inconvenienced at the sub registrar’s office ; administration negligence)

विशेष म्हणजे  राज्याचे नोंदणी व मुद्रांक शुल्क महानिरीक्षकांचे मुख्य कार्यालय (Head Office of the Inspector General of Registration and Stamp Duty) पुण्यातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आहे. याच कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांसाठी प्रतिक्षा कक्षच उपलब्ध नाही. पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याचे ही समोर आले आहे. काही कार्यालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. परंतू, सद्यस्थितीत ते बंद असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

राज्यभरातील बऱ्याच दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. त्यामुळे नोंदणी कार्यालयात नागरिकांना पिण्याचे पाणी, सीसीटीव्ही कॅमेरे, प्रतिक्षा कक्ष उपलब्ध करावेत, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस रोहन सुरवसे पाटील यांनी राज्याचे नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली आहे. यावेळी पुणे जिल्हा विद्यार्थी काँग्रेस सरचिटणीस कृष्णा साठे, सामाजिक कार्यकर्ते सचिन मोरे, दीपक चौगुले हे उपस्थित होते.

दस्त नोंदणीच्या माध्यमातून हजारो कोटींचा महसूल नागरिकांमुळे प्रशासनाला मिळत असतो. नोंदणी महानिरीक्षक कार्यालय व राज्यातील अनेक दुय्यम निबंधक कार्यालयात सर्वसामान्य नागरिकांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरा, प्रतिक्षा कक्ष ह्या गोष्टींची पूर्तता जर अधिकारी करू शकत नसतील तर खेदाची बाब आहे. नागरिकांसाठी तात्काळ सुविधा उपलब्ध करून द्याव्यात ही आमची मागणी आहे.

–  रोहन सुरवसे पाटील, सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस

Local ad 1