...

Guiwell Balance Syndrome found in Pune – पुण्यात आढळले गुईवेल बॅलेन्स सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण 

पुणे. शहरात आणि जिल्ह्यात गुईवेल बॅलेन्स सिंड्रोमचे २४ संशयित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी आयसीएमआरचे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी (National Institute of Virology – NIV) येथे पाठवण्यात आले आहेत. या दुर्मिळ आजाराबाबत पुणे महानगरपालिका आणि आरोग्य विभाग दक्षता बाळगत आहेत. (24 suspected patients of Guiwell Balance Syndrome found in Pune)

 

आरोग्य प्रमुख नीना बोराडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराचे रुग्ण पुणे शहरातील 6 आणि उर्वरित जिल्ह्यातील आहेत. हे रुग्ण उपचारासाठी पुण्यात दाखल झाले असून, हा आजार संसर्गजन्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात 24 संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 8 रुग्ण आयसीयूमध्ये असून, त्यातील दोघे व्हेंटिलेटरवर आहेत. पुणे महापालिका क्षेत्रातील 5, पिंपरी-चिचंवड मधील 2, ग्रामीण भागातील तब्बल 16 तर एक रुग्ण बाहेर जिल्ह्यातील आहे.

 

गुईवेल बॅलेन्स सिंड्रोम म्हणजे काय? – What is Guivel Balance Syndrome?

  • हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे, जो एक लाख लोकांपैकी एका व्यक्तीत आढळतो. वेगवेगळ्या प्रकारच्या लस घेतल्यानंतर किंवा एच1एन1 लस घेतल्यानंतर काही प्रकरणांमध्ये हा आजार होऊ शकतो. याचे निदान करण्यासाठी स्पायनल फ्लूडची चाचणी केली जाते. उपचारासाठी प्लाझ्मा एक्सचेंज सारख्या पद्धतींचा वापर केला जातो. हा आजार दुर्मिळ असला तरी घाबरण्यासारखा नाही, असे तज्ज्ञ सांगतात.

 

 

एनआयव्हीकडून रिपोर्ट आल्यानंतर ज्या भागात रुग्ण आढळले आहेत, त्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या टीम दाखल होणार आहेत. तसेच, ज्या हॉस्पिटलमध्ये हे रुग्ण उपचार घेत होते, त्या परिसरातील इतर रुग्णांचीही तपासणी केली जाणार आहे. महापालिकेने या रुग्णांची सखोल तपासणी सुरू केली असून, नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नसल्याचे सांगितले आहे. या दुर्मिळ आजारावर उपचार उपलब्ध असून, तो संसर्गजन्य नाही, हे विशेष आहे.

गुइलेन बॅरे सिंड्रोम हा एक दुर्मीळ आजार आहे. चेतासंस्थेच्या चाचण्या आणि स्पायनल फ्लुइड चाचण्या याच्या निदानासाठी आवश्यक असतात. आयव्हीआयजी अथवा प्लाझ्मा एक्स्चेंजसारख्या उपचारांमुळे रुग्णाला लवकरात लवकर मदत मिळू शकते. या आजाराचे बहुतेक रुग्ण बरे होतात. हा आजार कित्तेक वर्षांपासून आहे. हा आजार संसर्गजन्य नाही, त्यामुळे घाबरुन न जाता वेळेत डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावे. हे आजार असलेले 50 ते 60 टक्के रुग्ण हे एक ते दीड महिन्यांत बरे होता. तर उर्वरित 30 ते 40 टक्के रुग्णांना अधिक काळ उपचार घ्यावा लागतो.
–    डॉ. अविनाश भोंडवे, माजी आध्यक्ष आयएमए, पुणे.

Local ad 1