...

पुणे महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन कक्ष होणार मुंबई महापालिकेच्या व्यवस्थापन कक्षाच्या धर्तीवर

पुणे. मुंबई मनपाचे आपत्ती व्यवस्थापन कक्ष (Disaster Management Cell) हे सुसज्ज असून, पावसाळ्यात उद्भावणारी पुर परिस्थिती असो की, रस्त्यावर होणारी वाहतूक कोडीं आणि आपघात यांची संपूर्ण माहिती होते. त्यामुळे उपाययोजना केल्या जातात. त्याच धर्तीवर पुणे मनपाने ही सुसज्ज अशा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याची सिव्हिल कामासाठी 2 कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे हा कक्ष पावसाळ्या पुर्वी पूर्ण केले जाणार आहे. (Pune Municipal Corporation Disaster Management Cell to be modeled after Mumbai Municipal Corporation)

 

 

‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा फेब्रुवारीमध्ये

 

गेल्या काही वर्षां पुणे शहरात पाणी तुंबल्याचे प्रमाण वाढले असून, शहरात सुमारे १७१ ठिकाणी पावसाने पाणी साचते. त्याठिकाणी उपाययोजना केल्या जातात. त्यानंतर नवीन ठिकाणी पाणी साचते. गेल्या वर्षी पावसाळ्यात मुठा आणि मुळी नदी काठच्या भागात पुर परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच इतर भागातही पुराचे पाणी शिरते, अशा वेळी वेळीच माहिती नदीकाठच्या नागरिकांना दिले जाते. तरीही त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. सध्या पुणे महापालिकेकडे आपत्ती व्यवस्थापन कक्ष असून, त्यात केवळ 640 स्कोअर फुटात आहे. त्याठिकाणी मनुष्यबळ ही अपुरे आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापनात नियोजन करणे शक्य होत नाही. त्यामुळे मुंबईच्या धर्तीवर आपत्ती कक्ष उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याच्या अंतर्गत कामासाठी दोन कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

 

पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे महापालिकेकडून मुंबईच्या धर्तीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र आणि पूर्णवेळ कर्मचारी नियुक्त केले जाणार आहेत. या कक्षात नियुक्त कर्मचाऱ्यांना तसे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. पावसाळ्यापुर्वी हे कक्ष सुरु केले जाणार आहे. त्याच्या अंतर्गत कामासाठी निधीला मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच कामाला सुरुवात होईल.

– युवराज देशमुख, मुख्य अभियंता, विशेष प्रकल्प विभाग, पुणे. मनपा.

 

 

कर्मचाऱ्यांना दिले जणार प्रशिक्षण

मनपातर्फे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षासह पावसाळी कामांच्या नियोजनासाठी आवश्यक कर्मचारी क्षेत्रीय कार्यालय तसेच पथ विभाग, ड्रेनेज विभाग, पथ विभाग, मलनि:सारण विभागाकडून नेमले जातात. त्यासाठी, खासगी ठेकेदारांची मदत घेतली जाते. मात्र, आता मुंबई धर्तीवर कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याचे नियोजन आहे. या कर्मचाऱ्यांची नियुक्ती प्रत्येकी तीन वर्षांसाठी असेल. नियुक्तीपूर्वीच त्यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाईल.

 

कार्यालयांचे होणार स्थलांतर

आपत्ती व्यवस्थापन कक्ष हे मनपाच्या मुख्य इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर सुमारे 7400 चौरस फुट क्षेत्रात केले जाणार आहे. त्यासाठी सध्या त्या जागेत असलेले कार्यलय स्थलांतर केले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. सध्या त्या जागेवर मुख्यलेखा परिक्षक विभाग, उपायुक्त (विशेष कार्यालय), उपायुक्त झोपडपट्टी निर्मूलन व पुर्नवसन विभाग, बांधकाम विभागाचे भांडार रुम आणि विधी विभागाचे भांडर रुम आहे. त्यातील दोन कार्यालय सावरकर भवन येथे, एक कार्यालय मुख्य इमारतीच्या 5 व्या मजल्यावर आणि अन्य कार्यालय तळमजला येथील कर आकारणी येथे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


 

पाच कोटी रुपये होणार खर्च

सुसज्ज असा आपत्ती व्यवस्थापन कक्ष उभारले जात असून, त्यासाठी पाच कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. यामध्ये इंजिनिअरिंग रूम, कॉन्फरन्स रूम, कन्सल्टेशन रुम, कॅम्पूटर रूम, सर्व्हर रुम, लायब्ररी, स्टाफ रेस्ट रुम (8 बेड) अधिकाऱ्यांसाठी रेस्ट रुम तयार केले जाणार आहेत.

 

Local ad 1