पुणे : देशात बिगर काँग्रेसचे सरकार असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला. भाजपची सत्ता असताना संसदेत आंबेडकरांचे तैलचित्र लावण्यात आले. भाजप सरकारने मागील दहा वर्षात आंबेडकरांच्या कार्याचा गौरव करण्याचे काम सुरू आहे. मात्र, काँग्रेसने कायमच आंबेडकरांना अपमानित करण्याचे काम केले. त्यांनी आंबेडकर आणि संविधानाचा वापर केवळ राजकारणासाठी केला, अशी टिका केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्येतिरादित्य सिंधीया (Union Telecom Minister Jyetiraditya Scindia) यांनी केली. (Congress used Ambedkar only for politics: Jyotiraditya Scindia)
‘इनोव्हेट यु टेकाथॉन’ राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धा फेब्रुवारीमध्ये
भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमिवर भाजपच्या वतीने आयोजित केलेल्या संविधान गैरव अभियान सभेत सिंधिया बोलत होते. यावेळी राज्यसभा खासदार प्रा. मेधा कुलकर्णी, आमदार सुनिल कांबळे, हेमंत सासने,योगेश टिळेकर, अभियानाचे राज्य संयोजक अमित गोरखे, माजी राज्यमंत्री दिलीप कांबळे, शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, राजेश पांडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिंधिया म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गुरू मानून काम करत आहेत. मातत्र, देशाची प्रगती काहींच्या डोळ्यात खुपत आहे. काँग्रेसने संविधान कोपर्यात टाकले होते. आता गरज भासयला लागल्यानंतर ते हाती घेतले आहे. काँग्रेस राजकीय पोळी भाजण्यासाठी संविधानाचा उपयोग करत आहेत. काँग्रेसच्या सत्ताकाळात 75 वर्षात 106 वेळा घटना दुरुस्ती झाली. स्वातंत्र्यानंतर लगेच 1951 मध्ये माध्यमं व नागरिकांच्या स्वातंत्र्यावर नियंत्रण आणण्यासाठी घटना दुरुस्ती केली. काँग्रेसने संविधानातील तत्वे पायदळी तुडवण्याचे काम केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 हटवून संपूर्ण देश एकसंघ केला. समान नागरि कायदा लागू करण्याचे बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण केले. आता खिशात लाल पुस्तक ठेवून बाबासाहेबांचे नाव घेणार्यांनीच 1952 मध्ये बाबासाहेबांचा पराभव केला.
काँग्रेसच्या संविधान विरोधी काळाचा अस्त झाला असून भाजपचा संविधान गौरव काळ सुरू झाला आहे. भारताचे हे सर्वश्रेष्ठ संविधान युगानुयुगे जनतेला प्रेरणा आणि संरक्षण देत राहील. येत्या काळात भारत विश्वगुरु होण्यासोबतच जगातली तिसरी महासत्ता बनणार आहे. यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी खंबीर नेतृत्व करत आहेत. भारताचे संविधान गौरव अभियान जनतेला प्रेरक ठरेल, संविधान गौरव अभियानाने जनतेचा आत्मविश्वास वाढेल, असेही सिंधीया म्हणाले.