...

सावधान..! म्हडाचे घर देण्याच्या नावाखाली होऊ शकते फसवणूक !

म्हाडा म्हणते आम्ही एंजेट नेमले नाही

पुणे. खासगी बिल्डरकडून घर घेणे हे सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेले असून, त्यामुळे नागरिकांचा कल म्हाडा आणि शासनाकडून विविध योजनांतून मिळाणाऱ्या घरांकडे वाढला आहे. त्याचा फायदा घेण्यासाठी अनेक भामटे म्हडाचे घर अर्ज न करताही मिळवून देतो, असे आश्वासन देऊन पैसे लुबाडणारे पुण्यात फिरत आहेत. त्यामुळे यातून तुम्हांला अर्ज न करताही म्हाडाचे घर देण्याचे कोणी आश्वासन देत असेल तर तुमची फसवणूक होत आहे. कारण अशा प्रकारे म्हाडाने दलाल, एंजन नेमलेले नाही, असे स्पष्ट केले आहे. अशा प्रकारची तक्रार भोसरी पोलिस ठाण्यात दाखल झाली आहे. (Fraud Alert : Fraud is being committed by giving ‘MHADA’ houses!)

 

 

 

पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाकडून (म्हाडा) पुणे, पिंपरी -चिंडवड, पीएमआरडीए, सोलापूर, कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 294 घरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्याची पात्र लाभार्थ्यांची यादी सोमवारी रात्री प्रसिद्ध करण्यात येईल. लॉटरीमध्ये सहभाग न घेता म्हाडाचे घर मिळवून देतो असे सांगून पैशांची मागणी करीत असल्याची तक्रार भोसरी पोलिस ठाण्यात आली आहे. त्यानंतर म्हाडा प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या पुर्वी म्हाडाचे घर मिळवून देतो म्हणून यापूर्वी देखील अनेकांची फसवणूक झालेली आहे. काहींनी तर म्हाडाची बनावट वेबसाईट तयार करुन अनेकांना आर्थिक गंडा घातला आहे. हे प्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने घरखरेदीदारांना आवाहन करत असते. सदनिकांच्या विक्रीकरिता किंवा तत्सम कोणत्याही कामासाठी कोणालाही दलाल म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तीशी परस्पर आर्थिक व्यवहार करू नयेत, असे आवाहन पुणे म्हाडाकडून करण्यात आले आहे.

 

 

म्हाडातर्फे ऑनलाईन पद्धतीने घरांची विक्री करण्यात येते, याबाबत वेळोवेळी जाहीरातीद्वारे अर्ज विक्री करुन सोडतीद्वारे घरांचे वाटप केले जाते. सोडतीद्वारे वितरण करण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाकडून कोणत्याही व्यक्तीला प्रतिनिधी अथवा मध्यस्थ म्हणून नेमणूक केली नाही. नागरीकांना विनंती करण्यात येते कि या कामासाठी कुणाशीही संपर्क साधण्यात येवू नये, तसेच माहिती हवी असल्यास आपण www.mhada.gov.inhousing.mhada.gov.in या म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळांवर किंवा मिळकत व्यवस्थापक, पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्याशी कार्यालयात येवून संपर्क करावा. तसेच अर्जदारास कोणी दलाल व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा म्हाडाच्या नावे पैसे उकळणे किंवा फसवणूक करत असल्यास पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल कराव.

राहूल साकोरे, मुख्य अधिकारी, म्हाडा पुणे.

 

 

लॉटरी कधी निघणार ?

पुणे म्हाडाकडून सुमारे सव्वा सहा हजार खरांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यातील पात्र लाभार्थ्यांची यादी सोमवारी प्रसिद्ध केली जाणार असून, आता लॉटरी सोडत कधी काढली जाणार याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंना फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात लॉटरी निघेल, अशी माहिती पुणे म्हाडाचे मुख्य अधिकारी राहूल साकोरे यांनी दिली.

 

 

Local ad 1