मराठी परदेशी उद्योजक महाराष्ट्रात आणण्यासाठी धोरण तयार केले जाणार – उदय सामंत

पुणे : परदेशातील नोकऱ्यांबरोबरच आता उद्योगविश्वातही मराठी माणसाचे पाउल पुढे पडत आहे. मराठी माणसाला उद्योग व्यवसायामध्ये महत्त्वाची मदत व्हावी यासाठी महाराष्ट्र सरकार लवकरच परदेशी उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करणार आहे. तसेच नवीन धोरण तयार केले जाईल, अशी माहिती उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली आहे. ते पुण्यात जागतिक उद्योजकता परिषदेच्‍या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. (A policy will be prepared to bring Marathi foreign entrepreneurs to Maharashtra – Uday Samant)

 

 

यावेळी व्‍यासपीठावर जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर, प्रतापराव पवार, जेष्ठ विचारवंत तथा लेखक संदीप वासलेकर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, ‘गर्जे मराठी’ चे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू, महाराष्‍ट्र आर्थिक विकास परिषदेचे (एमइडीसी) अध्यक्ष अतुल शिरोडकर, पिंपरी- चिंचवड ट्रस्टच्या उपाध्यक्षा पद्मजा भोसले, गिरीश देसाई, कार्यक्रमाचे संयोजक सचिन इटकर यांसह देशातील आणि परदेशातील विविध क्षेत्रातील प्रमुख उद्योजक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

 

आनंद गानू यांनी परदेशातील मराठी उद्योजक, त्‍यांच्‍या मुलांना देशात यायचे असेल किंवा देशासाठी काहीतरी करायचे आहे त्‍यांच्‍यासाठी राज्‍यात एखादे स्‍वतंत्र मंत्रालय किंवा विभाग स्‍थापन करावा, अशी अपेक्षा यावेळी व्‍यक्‍त केली. त्याला उत्तर देताना  सामंत म्हणाले, उद्योजकांसाठी मंत्रालयाचा एक स्वतंत्र विभाग निर्माण करू. आता राज्‍यात स्थिर सरकार आले आहे. नवीन उद्योजकांना उद्योगांसाठी तात्‍काळ परवानगी मिळावी व त्‍यांचा कमी त्रास व्हावा म्हणून मंत्रालयात ‘फाईल ट्रॅकिंग सिस्टम’ येत्‍या दोन महिन्‍यांत कार्यान्वित होईल. यातून कामाची फाईल कोणाकडे किती काळ पडून राहते हे कळून ती तातडीने मंजूर करण्‍यात येईल. तसेच परदेशी मराठी उद्योजकांसाठी नवीन धोरण आखण्याची गरज असून, ते आखले जाईल, असे सामंत म्हणाले. रतन टाटा यांच्या मदतीने गडचिरोली, रत्‍नागिरी, पुणे येथे स्किल सेंटर चे काम चालू आहे. यातून दरवर्षी पाच हजार कौशल्‍य असलेले तरुण दरवर्षी तयार होतील.

 

महाराष्ट्रात पर्यटन उद्योगाला फार मोठी संधी – नितीन गडकरी

अमेरिकेत मराठी माणूस मोठया उद्योगात आघाडीच्‍या पदावर आहे. अभियांत्रिकी क्षेत्रात खूप चांगले काम करत आहे. भारतात ऑटोमोबाईल हब तयार झाले. दळणवळण सुविधा आहेत. जोपर्यंत उद्योग येणार नाही तोपर्यंत रोजगार येणार नाही व गरिबी दूर होणार नाही. सध्या बायो फ्युएल, हायड्रोजन फ्युएल तयार करण्यात येत आहे. येणाऱया काळात विकासाचा मापदंड हा निर्यात वाढवणे आहे.

Local ad 1