पुणे : घरांच्या किमती सलग पाचव्या वर्षी वाढल्या आहेत. संपूर्ण शहरात सरासरी दर 10.98 टक्के वाढून 6 हजार 590 रुपये प्रति चौरस फूट या उच्चांकावर पोहोचले आहे. विकासकांनी बाजारात आणलेल्या इन्व्हेंटरी मध्ये घट झाल्यामुळे विक्रीतील मंदी आली. एकूण विक्री 2022 मध्ये विकल्या गेलेल्या 1.03 लाख घरांवरून 2023 मध्ये सुमारे 94,500 घरे आणि 2024 मध्ये सुमारे 90,000 घरांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. एकूण विकल्या गेलेल्या घरांची संख्या अजूनही जास्त असली तरी, एकूण विक्रीच्या प्रमाणात झालेली घट ही सावध करणारी आहे. गेरा डेव्हलपमेंट प्रायव्हेट लिमिटेडने (GDPL) पुणे रेसिडेन्शिअल रियल्टी या द्वि-वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला (Gera Development Private Limited releases Pune Residential Realty Report) आहे. त्यात 3 लाखांहून अधिक बांधकामाधीन युनिट्स आणि 2,300 हून अधिक प्रकल्पांचा समावेश आहे. हा अहवाल जानेवारी-डिसेंबर 2024 मधील क्षेत्रातील कामगिरीवर लक्ष केंद्रित करून पुण्याच्या निवासी रिअल इस्टेट मार्केटमध्ये सखोल माहिती देतो. (House prices increase in Pune; home purchases fall by 5 percent)
‘पुरंदर’ येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ कधी होणार पूर्ण ? आली महत्वाची अपडेटस्
अहवालातील मुख्य मुद्दे
1. लक्झरी विभागातील वाढ