मुंबई । राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले असून, मंत्रीमंडळाचा विस्तार ही झाला आहे. त्यामुळे आता आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांना बदली होण्याची भिती आहे. कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी ‘क्रिम पोस्ट’ (Cream post) मिळवली आहे. त्यातच राज्याचे मुख्यमंत्री बदल्याने ते आपल्या मर्जित अधिकाऱ्यांना ‘क्रिम पोस्ट‘ देतील अशी शक्यता असल्याची चर्चा अधिकाऱ्यांमध्ये आहे. तीन दिवसांपूर्वी 23 अधिकाऱ्याच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले होते. त्यातच मंगळवारी पुन्हा 12 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यात महसूल विभागातून पदोन्नती मिळवून आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. (Transfers of IAS officers in Maharashtra)
पुण्यात नव वर्षाच्या स्वागताची पार्टी चालणार ‘फुल नाईट’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी
मंगळवारी राज्य सरकारने १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, त्यात उद्योग विभागाच्या सचिवपदी डॉ. पी. अनबलगन तर ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे (IAS Dr. Harshdeep Kamble) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बेस्ट’चे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर (IAS Anil Diggykar) यांची दिव्यांग कल्याण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली. डॉ. बी. राधाकृष्णन यांची ‘महाजेनको’ या वीज कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर संजय दैने (वस्त्रोद्योग आयुक्त, नागपूर), राहुल कर्डिले (नाशिक महानगरपालिका आयुक्त), सी. वनमती (जिल्हाधिकारी वर्धा), संजय पवार (सह आयुक्त विक्रीकर विभाग), अविशंत पंडा (गडचिरोली जिल्हाधिकारी), विवेक जॉनसन (मुख्य कार्यकारी अधिकारी, चंद्रपूर जिल्हा परिषद), अण्णासाहेब चव्हाण (मुख्य कार्यकारी अधिकारी, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, मुंबई), गोपीचंद कदम (मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर स्मार्ट सिटी) आदींची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्यातील 23 सनदी अधिकाऱ्यांच्या एकदम बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नंदिनी मिलिंद आवाडे (IAS Nandini Milind Awade) यांची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिवपदी नियुक्ती झाली असून विधान परिषदच्या उपसभापतींचे खासगी सचिव रवींद्र खेबुडकर यांची मंत्रालयातील अल्पसंख्याक विकास विभागाच्या मुंबई सहसचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने १२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून, उद्योग विभागाच्या सचिवपदी डॉ. पी. अनबलगन तर ‘बेस्ट’च्या महाव्यवस्थापकपदी डॉ. हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संजय पवार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर म्हणून नियुक्ती. नंदू बेडसे यांची आयुक्त, अल्पसंख्याक विकास, छत्रपती संभाजी नगर म्हणून नियुक्ती. सुनील महिंद्राकर यांची व्यवस्थापकीय संचालक, एम.एस. या पदावर बदली. रवींद्र खेबुडकर यांची अल्पसंख्याक विकास विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती. लक्ष्मण राऊत यांची बाल हक्क संरक्षण आयोग, मुंबईच्या सचिवपदी, बाबासाहेब बेलदार (SCS बढती) यांची अतिरिक्त विभागीय आयुक्त, छत्रपती संभाजीनगर विभाग म्हणून नियुक्ती करण्यात आली. जगदीश मिनियार यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, छत्रपती संभाजी नगर या पदावर नियुक्ती केली आहे. माधवी सरदेशमुख यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी, कल्याण – डोंबिवली, डॉ. ज्योत्स्ना पडियार यांची आयुक्त, अर्थशास्त्र आणि सांख्यिकी, मुंबई म्हणून नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. अण्णासाहेब चव्हाण यांची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी म्हणून नियुक्ती. गोपीचंद कदम (SCS Promotion) यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती. बापू पवार यांची सहसचिव, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली. महेश आव्हाड यांची हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. वैदेही रानडे (SCS Promotion), यांची सहव्यवस्थापकीय संचालक, MSRDC, मुंबई म्हणून नियुक्ती. विवेक गायकवाड (SCS Promotion), यांची नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर सहसचिव म्हणून नियुक्ती. नंदिनी आवाडे (SCS Promotion), यांची सदस्य सचिव, महाराष्ट्र राज्य महिला आयोग, मुंबई म्हणून नियुक्ती. वर्षा लड्डा (एससीएस पदोन्नती), यांची MAVIM, मुंबईच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती. मंगेश जोशी (SCS Promotion) यांची उपमहासंचालक, YASDA, पुणे म्हणून नियुक्ती. अनिता मेश्राम (SCS Promotion) यांची संचालक, माहिती तंत्रज्ञान, मुंबई म्हणून नियुक्ती. गीतांजली बाविस्कर (SCS Promotion) यांची राज्य प्रकल्प संचालक, समग्र शिक्षा अभियान, मुंबई म्हणून नियुक्ती. दिलीप जगदाळे (SCS Promotion) यांची महाडिस्कॉम, कल्याण सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती आणि अर्जुन चिखले (SCS Promotion) यांची सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ, नागपूर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.