पुण्यात नव वर्षाच्या स्वागताची पार्टी चालणार ‘फुल नाईट’ ; जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी

पुणे : पुण्यामध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी मद्यप्रेमींना रात्री एक पर्यंत मद्य खरेदी तर पहाटे पाच पर्यंत पार्टी करता येणार आहे. पार्टी ‘फुल नाईट’ (New Year’s Party) करता येणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पहाटे पाच पर्यंत रेस्टॉरंट, बार सुरू ठेवण्यास परवानगी चे आदेश दिले आहेत. तर वाईन शॉप आणि बिअर शाॅपीमधून (Wine shop, beer shop) मद्यविक्रीसाठी रात्री एक वाजेपर्यंत जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. (New Year’s Party Can Be Held ‘ full Night’)

 

छगन भुजबळांना भाजपमध्ये घेणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

 

नाताळ आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी पार्टी पहाटे पाच पर्यंत करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली होती, त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पुण्यासाठी आदेश दिले आहेत. त्यामध्ये पुण्यात नाताळनिमित्त होणाऱ्या पार्टीसाठी पहाटे पाचपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. बुधवारी (दि.२५) आणि मंगळवारी (दि३१) या दोन दिवशी ही परवानगी देण्यात आली असून, मंगळवारी (दि. २४) सुद्धा पहाटेपर्यंत परवानगी देण्यात आली होती. नाताळनिमित्त शहरामध्ये विविध पार्टी आयोजित केल्या जातात. यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडे पन्नास अर्ज आले होते, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. ही परवानगी केवळ एक दिवसांसाठीच देण्यात आली असल्याचे उत्पादन शुल्क विभागाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पुण्यात मद्यविक्रीची जवळपास तीन हजार दुकाने आहेत. या दुकानांतून नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्याप्रमाणात मद्याची विक्री होते.

 

 

बेकायदा मद्यावर करडी नजर    

नवीन वर्षाचे स्वागत आणि नाताळ सणानिमित्त मद्याची विक्रीमध्ये वाढ होत असते. त्यामुळे मद्य तस्करांकडून गोवा बनावटीचे व भेसळ मद्याची चोरट्या मार्गाने वाहतूक आणि विक्री केली जाते. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर आहे. त्यासाठी पथके नियुक्त करण्यात आले असून, डिसेंबरमध्ये विविध 314 ठिकाणी कारवाई केली आहे. त्यात 386 जणांना अटक केली असून, 29 वाहने जप्त करण्यात आली आहेत.  

 

 

 

पहाटे पाच वाजेपर्यंत पार्टी करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे कोणीही अनधिकृतपणे पार्टीमध्ये मद्य पुरवठा करु नये. नवीन वर्षाचे स्वागतासाठी आय़ोजित पार्टीमध्ये मद्य वितरीत करायचे असल्यास परवाना घ्यावा. ज्या ठिकाणी मद्यप्राशन करण्याची परवानगी नाही, अशा ठिकाणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पथके छापेमारी करुन कारवाई करतील. 
– चरणसिंह राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग.

 

Local ad 1