छगन भुजबळांना भाजपमध्ये घेणार का ? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…

भुजबळांचा प्रश्‍न पक्षाअंतर्गत प्रश्‍न, तो आमचा आम्ही सोडवू - अजित पवार 

पुणे : “छगन भुजबळ यांचा प्रश्‍न हा आमच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्‍न आहे. तो आमचा आम्ही सोडवु’ अशा शब्दात उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार (Deputy Chief Minister and Nationalist Congress Party President Ajit Pawar) यांनी सोमवारी भुजबळ यांच्या नाराजीवरुन होणाऱ्या टिकेला उत्तर दिले. तसेच भुजबळ यांच्या नाराजीनाट्यावर अधिक बोलण्याचे टाळले. (Bhujbal’s issue is within the party, we will solve it ourselves – Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पवार यांनी मंगळवारी शहर व जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्‍नांसंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीला उपस्थिती लावली. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्या नाराजीबाबत प्रश्‍न विचारल्यानंतर, थोडक्‍यात उत्तर देत त्याविषयी बोलण्याचे टाळले.

 

अबब.. पुणे पुस्तक महोत्सवात २५ लाख पुस्तकांची खरेदी ; तब्बल ४० कोटींपेक्षा अधिक रुपयांची उलाढाल

 

पवार यांनी शहर व जिल्ह्यातील प्रश्‍नासंदर्भात बैठक घेतली होती. या बैठकीस महापालिका, पोलिस, विभागीय कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. याविषयी पवार म्हणाले, “”शहरातील वाहतुक कोंडी, रिंगरोड, यासंदर्भात बैठकीत चर्चा झाली. त्यामध्ये प्रलंबित प्रश्‍नासंदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी 15 दिवसांनी एक बैठक होणार आहे. या बैठकीस पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, वाहतुक शाखेचे पोलिस उपायुक्त या सर्वांना बोलावले जाणार आहे. या बैठकीतुन प्रलंबित प्रश्‍नांवर मार्ग काढण्याचा प्रयत्न असेल. या बैठकीच्यावेळी लोकप्रतिनीधी देखील भेटण्यासाठी आले होते, त्यांचे पीएमआरडीए, दोन्ही महापालिका, विभागीय आयुक्त कार्यालयाशी संबंधित प्रश्‍न होते. सारथीबाबतही काही प्रश्‍न आहेत, नियोजन समितीअंतर्गत सारथी येते, त्यामुळे त्यांचेही प्रश्‍न आम्ही समजुन घेणार आहोत. वढु तुळापुर येथे संभाजी महाराज यांच्या स्मारकाची पाहणी केली जाणार आहे, कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभाला भेट देण्यासाठी 1 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्याची ही पाहणी करणार आहोत.”

 

पवार म्हणाले, “केईएम रुग्णालयाच्या जागेचा प्रश्‍न आहे, विभागीय आयुक्तांनी त्यासंदर्भात माहिती दिली आहे. पर्यायी जागा दिल्यास ते तिकडे स्थलांतरीत होण्याची शक्‍यता आहे, त्यावरही काही मार्ग काढण्याचा प्रयत्न करु. बारामती मध्ये 100 खाटांचे रुग्णालयात उभारले जाणार आहे. संबंधित रुग्णालयाला कोणत्या प्रकारच्या फरशा बसवाव्यात, यासंदर्भातील पाहणी केली.

भुजबळ भाजपमध्ये येणार का या प्रश्नांवर देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्टीकरण

छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात न घेऊन त्यांना डावलण्याचा हेतू नव्हता. फक्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मतापेक्षा भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचे वेगळे मत होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला आहे. भुजबळ यांच्यासारखा नेता आमच्या सोबत मैदानात असला पाहिजे यानुसार त्यांच्या मुद्द्यावर तोडगा काढला जाईल,’’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Chief Minister Devendra Fadnavis) यांनी सोमवारी (दि.२३) व्यक्त केला.
पुण्यातील शेतकरी सन्मान दिनाच्या निमित्त आयोजित कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी भुजबळ यांच्या भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. आम्ही तिन्ही पक्ष एकत्र आहोत. एकत्रच निर्णय करायचे आहेत. भुजबळ भाजपमध्ये येण्याचा प्रश्न येत नसल्याचेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले. तर ‘‘छगन भुजबळ हे महायुतीचे प्रमुख नेते आहेत. तिन्ही पक्षांच्या नेत्यांच्या मनात त्यांच्याबद्दल सन्मानाची भावना आहे. महायुतीच्या विजयात त्यांचाही महत्त्वाचा वाटा राहिला आहे. स्वत: अजित पवारही त्यांची चिंता करतात. मुळात भुजबळांना अजित पवार यांनी मंत्रिमंडळात घेतले नाही तेव्हा भुजबळांना डावलण्याचा त्यांचा हेतू नव्हता. ‘आमचा पक्ष राष्ट्रीय पक्ष राहिला आहे. आम्हाला तो राष्ट्रीय स्तरावर मोठा करायचा आहे. देशातील अन्य राज्यातही मान्यता असणाऱ्या भुजबळांसारख्या नेत्याला आम्हाला राष्ट्रीय स्तरावर पाठवायचे होते,’ अजित पवारांनी मला सांगितले. पण अजित पवार यांच्या मतापेक्षा भुजबळांचे मत जरा वेगळे होते. त्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला,’’ असेही फडणवीस यांनी सांगितले.
परभणी येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भेट दिल्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले, ‘‘राहुल गांधी यांची ही राजकीय भेट होती. मागील काही वर्षांपासून ते विद्वेष पसरवण्याचे काम करत आहेत. त्यासाठीच ते परभणीला आले होते. आम्ही न्यायालयीन चौकशीची घोषणा केली आहे. त्यात जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. त्यात जर पोलिस मारहाणीत मृत्यू झाल्याचे आढळले तर, कारवाई केली जाईल.’’तसेच ‘‘पालकमंत्री पदासाठी कोणतीही रस्सीखेच नाही, आमच्या तिन्ही पक्षातील ठरवलेले नेते एकत्र बसवून ठरवतील,’’ असेही फडणवीस यांनी सांगितले तर, ‘‘पुढील सात ते आठ दिवसांत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यावर वर्ग केले जातील,’’ असा विश्वास ही फडणवीस यांनी व्यक्त केला.
Local ad 1