नांदेड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचे रखडलेले खाते अखेर जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ह्या पालकमंत्री पद कोणाला मिळतो, याकडे लागले आहे. जिल्ह्यातील अनेक जिल्ह्यांना मंत्री पद मिळालेले नाही. त्यामुळे त्या ठिकाणी बाहेरील पालकमंंत्री नेमावे लागणार आहे. नांदेड जिल्ह्यात एकाही आमदाराला मंत्री पदाची संधी मिळालेली नाही. त्यामुळे येथेही बाहेरील पालकमंत्री असणार आहे. त्यामुळे आता कोणाची वर्णी लागणार याकडे लक्ष लागले आहे.
Maharashtra Portfolio Allocation : अखेर खातेवाटप जाहीर ; कोणत्या मंत्र्याला कोणते खाते ?
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे 9 पैकी 9 आमदार विजयी झाले. मात्र, त्यातील एकाही आमदाराला मंत्रीमंडळात स्थान दिले गेले नाही. त्यामुळे आता बाहेरील जिल्ह्यातील पालकमंत्री नांदेडला मिळणार हे निश्चित आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाहेरील पालकमंत्री नांदेडकरांच्या माथी मारले जाणार असून, त्यात मुंडे बंधु-बघीने यांचे नाव चर्चेत आहे. (Who will be the Guardian Minister of Nanded?)
विधानसभा निवडणुकीत महायुतीला ९ पैकी ९ जागा मिळाल्या, स्टाईल रेट १०० टके निघाला. पण मंत्रीपद देताना मात्र भाजप, शिदेसेना, अजित पवार राष्ट्रचादी काचिस पक्षाने आमदारांना कोलले बाचा फटका नदिड जिल्ह्याला बसणार आहे. मंत्रीपद न मिळाल्याने पालकमंत्री बाहेरचा असेल. त्यांना नांदेड जिल्ह्याबाबत तळमळ नसेल. याचा परिणाम नांदेड जिल्ह्याच्या विकासावर होणार आहे.
गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे यांचे नाव पालकमंत्री म्हणून चर्चेत आहे. सर्वच जन आपआपला जिल्हा व मतदारसंघ सोडून नांदेड जिल्हाला वेळ देतील, असे वाटत नाही. मुंबईत बसून नांदेड जिल्ह्याचा कारभार हकलतील हे निश्चित आहे.