मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारच्या (Devendra Fandnavis Cabinet) मंत्र्यांच्या शपथविधीच्या 8 दिवसानंतर अखेर खातेवाटप (Maharashtra portfolio distribution) जाहीर झाले आहे. हिवाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Winter session) शेवटच्या दिवशी सर्व 33 कॅबिनेट आणि 6 राज्य मंत्र्यांना खातेवाटप (Khatevatap) करण्यात आले आहे. त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे गृह खाते ठवले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी सर्वात आधी 5 डिसेंबरला शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबरला 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र अजून पर्यंत त्यांचे खातेवाटप रखडले होते. त्यामुळे विरोधक दररोज टीका करत होते. हिवाळी अधिवेशन विनाखात्याचे मंत्री म्हणून मंत्र्यांनी काम केलं. अखेर आज खातेवाटप झाल्याने, या शपथ घेतलेल्या मंत्र्यांना अधिकृत मंत्रालय मिळाले.
https://x.com/ANI/status/1870493946952269931
अपेक्षेप्रमाणे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहे. याशिवाय ऊर्जा, न्याय व विधी, सामान्य प्रशासन, माहिती व प्रसारण व खातेवाटप न झालेल सर्वच खाते फडणवीस यांनी स्वत:कडे ठेवले आहेत. तर नगरविकास मंत्रालय एकनाथ शिंदे यांच्याकडे दिले आहे. याशिवाय ग्रामविकास मंत्रालय, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम विभाग ही एकनाथ शिंदें यांच्या मंत्र्यांना मिळाली आहेत. तर अर्थमंत्रालय आणि राज्य उत्पादन शुल्क ही खाती अजित पवार यांच्या मंत्र्यांना देण्यात आले आहे.
राहिलं आहे.
कोणाला कोणते खाते मिळाले
देवेंद्र फडणवीस : गृह मंत्रालय
एकनाथ शिंदे : नगरविकास
अजित पवार : अर्थ
चंद्रशेखर बावनकुळे : महसूल
राधाकृष्ण विखे पाटील : जलसंधारण
हसन मुश्रीफ : वैद्यकीय शिक्षण
चंद्रकांत पाटील : उच्च तंत्र शिक्षण
गुलाबराव पाटील : पाणीपुरवठा
धनंजय मुंडे : अन्न व नागरी पुरवठा
दादाजी भुसे : शालेय शिक्षण
गणेश नाईक : वनखातं
संजय राठोड : माती व पाणी परीक्षण खात
मंगलप्रभात लोढा : कौशल्य विकास
उदय सामंत : उद्योग व मराठी भाषा
जयकुमार रावल : विपणन
पंकजा मुंडे : पशुसंवर्धन आणि पर्यावरण
अतुल सावे : ओबीसी विकास, दुग्धविकास
अशोक उईके : आदिवासी विकास
शंभूराज देसाई : पर्यटन व खाण स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
आशिष शेलार : माहिती व तंत्रज्ञान
दत्तात्रय भरणे : क्रीडा व अल्पसंख्याक विकास
अदिती तटकरे : महिला व बालविकास
शिवेंद्रराजे भोसले : सार्वजनिक बांधकाम
माणिकराव कोकाटे : कृषी
नरहरी झिरवाळ : अन्न व औषध प्रशासन
जयकुमार गोरे : ग्रामविकास आणि पंचायत राज
संजय शिरसाट : सामाजिक न्याय
भरत गोगावले : रोजगार हमी व फलोत्पादन
नितेश राणे : मत्स्य आणि बंदरे
प्रताप सरनाईक : वाहतूक
बाबासाहेब पाटील : सहकार
मकरंद पाटील : मदत व पुनर्वसन
प्रकाश आबिटकर : सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण