...

पुण्यात युवक काँग्रेसकडून रास्ता रोको आंदोलन

पुणे : पुणे शहर व ग्रामीण युवक काँग्रेसकडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्रिय गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Shah) यांच्या राजीनाम्याची मागणी यावेळी करण्यात आली. युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब (Youth Congress National President Uday Bhanu Chib) यांच्या बेकायदेशीर अटकेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बालगंधर्व चौकात जमून रस्ता रोखण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. (Youth Congress protest in Pune)

 

 

Youth Congress protest in Pune

गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू छिब यांना आसाम पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर अटकेचा देखील निषेध केला आहे. यावेळी प्रदेश युवक काँग्रेसचे सहप्रभारी एहसान खान (Youth Congress co-in-charge Ehsan Khan), शहराध्यक्ष सौरभ अमराळे (City President Saurabh Amrale), प्रसार माध्यम विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन (Akshay Jain, Chairman of the Media Department), ग्रामीण अध्यक्ष उमेश पवार, प्रदेश सरचिटणीस रोहन सुरवसे (General Secretary Rohan Suravase), प्रथमेश आबनावे, मेघश्याम धर्मावत,आनंद दुबे, हृषीकेश विरकर, अभिजित चव्हाण,सद्दाम शेख, मुरलीधर बुधराम,धनराज माने, अक्षय अवचिते, मारुती तलवारे, हर्षद हांडे, पवन खरात यांच्या सोबत असंख्य कार्यकर्ते होते.

 

 

युवक काँग्रेस सहप्रभारी एहसान खान म्हणाले, “अमित शहा यांचे वक्तव्य अतिशय लज्जास्पद आहे. हे त्यांच्याच मनातील विचार आहेत, जे त्यांच्या तोंडून बाहेर आले. त्यांना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.”

 

 

युवक काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अक्षय जैन म्हणाले, “गौतम अदानींवर कारवाई करण्याऐवजी आणि संसदेच्या संयुक्त संसदीय समितीकडून (JPC) चौकशी करण्याऐवजी सरकार विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर खोटे आरोप लावत आहे. तसेच युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष यांना आसाम पोलिसांनी अटक करणे पूर्णपणे बेकायदेशीर आहे.”

 

 

पुणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष सौरभ अमराळे म्हणाले, “सरकारची ही चाल फक्त मुख्य प्रश्नांवरून लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी आहे आणि त्यांना या गोष्टींत अडकवून ठेवण्यासाठी आहे. त्यामुळे आम्ही रस्त्यावर उतरून या अन्यायाविरुद्ध लढा देत आहोत.”

 

Local ad 1