पुणे. नागरिकांनी माझ्यावर विश्वास ठेवत सलग चौथ्यांदा निवडून दिले. त्यांचा हा विश्वास खूप अमूल्य आहे. येत्या काळात खडकवासला मतदारसंघात (Khadakwasla Constituency) मोठ्या प्रमाणात विकासकामे केली जाणार आहे. नागरिकांनी कोणतेही काम असल्यास मला संपर्क करावा, अशा विश्वास आमदार भीमराव तापकीर ( MLA Bhimrao Tapkir) यांनी व्यक्त केला. (Ready for the development of Khadakwasla constituency MLA Bhimrao Tapkir)
एसटीला नोव्हेंबरमध्ये विक्रमी 941 कोटींचे उत्पन्न ; तोटा ही 11 हजार कोटींवर पोहोचला
Related Posts
धायरी येथील दादासाहेब मनोरे प्रबोधिनी (Dadasaheb Manore Prabodhini) व धायरी ग्रामस्थ यांच्यावतीने टिळक स्मारक मंदिर येथे आमदार तापकीर यांचा नागरी सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे धायरी नगर संघचालक सचिन नागपुरे (Dhayari Nagar Sanghchalak Sachin Nagpure), संस्थेचे अध्यक्ष प्रशांत मनोरे, उपाध्यक्ष विलास नऱ्हे, सचिव संतोष पवार, डॉ. श्रुती मनोरे, प्रा. डॉ. भीमाशंकर बिराजदार,अमित गुजर, सचिन मोरे, विश्वस्त राजेश गुळेकर, शैलेश आर्ते, राजेंद्र घुले, प्रवीण गोगावले, शिवाजी साळुंखे, सोमशेखर कमतगी, गिरीश भवाळकर, कालिदास सोनावणे, विजय शेकदार, वृषाली शेकदार, वंदना कदम, अल्पना थोरात, अंजली कुलकर्णी, योगिता धिमधिमे, रोहिणी पाटील, मोहिनी पिंपळगावकर, नीलम देशपांडे, अमृता काळे, पूनम कांबळे, अर्जुन व्हजगे, राजाभाऊ गोवे, नागनाथ चौधरी, रत्नाकर मोकाशे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. विलास नऱ्हे यांनी आभार मानले.