Pune Book Festival । तिसऱ्या दिवशी परीक्षेच्या पूर्वतयारी मार्गदर्शकांपासून ते भक्तीपर कवितेचा आस्वाद
चिल्ड्रन कॉर्नरमधील पहिल्या सत्राचे नेतृत्व भाषण आणि नाटक प्रशिक्षक पूजा उपगनलावार यांनी केले, जिथे तिने मुलांना संगीत, नृत्य आणि प्रॉप्सच्या मदतीने कथाकथनाच्या सत्रात गुंतवून ठेवले. व्यवसायाने शास्त्रज्ञ आणि आवडीने कलाकार असलेल्या श्रद्धा निगावेकर यांनी थिएटर-सुधारणा सत्राचे नेतृत्व केले आणि कलाकार रश्मी वैद्य यांनी मातीची शिल्पकला कार्यशाळा आयोजित केली. फर्ग्युसन कॉलेजच्या ॲम्फीथिएटरमधील बालचित्रपट महोत्सवात ‘सेल्फी विथ रोस्तम’ आणि ‘सू’ सारखे जागतिक चित्रपट आणि ‘द फर्स्ट फिल्म’ आणि ‘छोटा भीम और एम’ सारखे भारतीय चित्रपट दाखवण्यात आले.
उद्या काय असेल
जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात
पुणे पुस्तक महोत्सव देशासाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे. हा महोत्सव देशाला पुढे नेणारा, पंतप्रधानांच्या संकल्पाला पुढे नेणारा, महाराष्ट्र विकसित करणारा आहे. महाराष्ट्राची उंची वाढत आहे, अशी भावना राज्याचे कॅबिनेटमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली. तसेच जगातील सर्वांत मोठा पुस्तक महोत्सव पुण्यात होईल, त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे सरकारकडून महोत्सवाला सर्वतोपरी मदत केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाला बावनकुळे यांनी सोमवारी भेट दिली. त्या वेळी बावनकुळे बोलत होते. पुणे पुस्तक महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, संयोजन समितीचे सदस्य प्रसेनजित फडणवीस, भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राघवेंद्र मानकर या वेळी उपस्थित होते.
पुणे पुस्तक महोत्सवासारखा महोत्सव ठाणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर येथेही झाल्यास तेथील नागरिकांचे पुस्तक प्रेम वाढेल. विभागीय केंद्रांवरही आता लक्ष दिले पाहिजे. राजेश पांडे यांच्या नेतृत्त्वाखाली अनेक कार्यक्रम यशस्वी झाले आहेत. मेरा माटी मेरा देश या कार्यक्रमाची देशात चर्चा झाली होती, असेही बावनकुळे यांनी सांगितले.
पांडे म्हणाले, की पुणे पुस्तक महोत्सवाच्या माध्यमातून वाचन, पुस्तकाची चळवळ करण्याचा प्रयत्न आहे. गेल्या दोन दिवसांत पुणेकरांची महोत्सवाला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आतापर्यंत अडीच लाखांपेक्षा अधिक पुणेकरांनी भेट दिली आहे, पुस्तकांची खरेदी केली आहे. सांस्कृतिक कार्यक्रमांनाही उत्तम प्रतिसाद लाभतो आहे. पुणेकरांनी हा पुस्तक महोत्सव यशस्वी करून दाखवला आहे.